मोनोकिनीमध्ये जान्हवी कपूरचा हॉट अंदाज, जान्हवीची ग्लॅमरच स्टाईल पाहून तुम्हालाही लागेल वेड

जान्हवी कपूरने मालदीव गाठलं आणि आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. जान्हवी कपूर आपल्या फ्रेंन्डसोबत मालदीवमध्ये पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांत बरेच सेलिब्रिटी मालदीवमध्ये सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी जात आहेत  

Updated: Apr 9, 2021, 06:11 PM IST
 मोनोकिनीमध्ये जान्हवी कपूरचा हॉट अंदाज, जान्हवीची ग्लॅमरच स्टाईल पाहून तुम्हालाही लागेल वेड title=

मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरच्या फॅन्सची यादी खूप मोठी आहे. जान्हवीने आत्तापर्यंत मोजकेच चित्रपट केलेत, परंतु तरीही जान्हवीची चाहत्यांमध्ये कमालीची क्रेज पहायला मिळते. जाह्नवीने आपल्या करिअरची सुरूवात धडक सिनेमातून केली. जान्हवी तिच्या चाहत्यांसाठी आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर कायम शेअर करत असते. अलीकडेच जान्हवी कपूरने आपल्या धाडसी अभिनयानं सर्वांना क्लीनबोल्ड केलं आहे.

आई श्रीदेवीला मिळालेली प्रसिद्धी तेवढी जान्हवी मिळाली नसेल. पण जान्हवी ज्या प्रकारे परिश्रम घेत आहे, त्यात नक्कीच ती सुपरस्टार बनेल अशी चाहत्यांना आशा आहे. अलीकडेच जान्हवी कपूरने आपले मालदीवचे हॉट फोटो शेअर केले आहेत.

जान्हवी कपूरने हॉट फोटो शेअर केले आहेत
देशात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सही या साथीच्या कचाट्यात सापडत आहेत, अशा परिस्थितीत मुंबईहून अनेक सेलेब्रिटी सुट्टीसाठी मालदीवमध्ये जात आहेत. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरही या यादीत सामील झाली आहे. जान्हवी आपल्या फ्रेंन्डसोबत मालदीवमध्ये पोहोचली आह

जान्हवी कपूरने अलीकडेच मोनोकिनीमधील फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. फोटोंमध्ये जान्हवी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये ती समुद्राच्या किनाऱ्यावर सुट्टयांचा आनंद घेताना दिसत आहे.

फोटो शेअर करत जान्हवीने ''बेधुंद'' अशा आशयाचं कॅप्शन लिहिलं आहे. अशा धाडसी शैलीत जान्हवी क्वचितच दिसली आहे. ती बर्‍याचदा सिंपल लूकमध्ये फोटो शेअर करत असते. जान्हवीचा हा बोल्ड लूक पाहून चाहत्यांना वेड लागेल हे नक्की. चाहत्यांनी भरभरून कमेंट करून जान्हवीच्या फोटोंचं कौतुक केलं आहे.

नुकतंच जान्हवी कपूरने मालदीव गाठलं आणि आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. जान्हवी कपूर आपल्या फ्रेंन्डसोबत मालदीवमध्ये पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांत बरेच सेलिब्रिटी मालदीवमध्ये सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी जात आहेत. या स्टार्समध्ये दीया मिर्झा, बिपाशा बासू-करणसिंग ग्रोव्हर, शिल्पा शेट्टी, सारा अली खान, नेहा धूपिया, श्रद्धा कपूर सारख्या अनेक स्टार्सचा समावेश आहे.