46 व्या वर्षी काजोलच्या बहिणीनं व्यक्त केली लग्न आणि आई होण्याची इच्छा, का आतापर्यंत राहिली अविवाहीत?

Tanishaa want's to get married and have child : तनीषानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वयाच्या 46 व्या वर्षी लग्न करण्याविषयी आणि आई होण्यावर वक्तव्य केलं आहे. त्याशिवाय ती आतापर्यंत अविवाहीत का आहे याचा खुलासा देखील केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 17, 2024, 05:49 PM IST
46 व्या वर्षी काजोलच्या बहिणीनं व्यक्त केली लग्न आणि आई होण्याची इच्छा, का आतापर्यंत राहिली अविवाहीत?   title=
(Photo Credit : Social Media)

Tanishaa want's to get married and have child : बॉलिवूड अभिनेत्री काजोलची बहीण तनीषा मुखर्जी ही चित्रपटांपासून रिअॅलिटी शोपर्यंत सगळ्याच गोष्टीत सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. जेव्हा तनीषा 'झलक दिखला जा' मध्ये दिसली होती तेव्हा तिनं खासगी आयुष्याविषयी अनेक खुलासे केले होते. तनीषा या शोची विजेती ठरली नसली तरी देखील तिनं सगळ्यांची मने जिंकली. ती लवकरच 'लव यू शंकर' या चित्रपटात दिसणार आहे. त्यात तिच्यासोबत श्रेयस तळपदे देणार आहे. तर या चित्रपटात वयाच्या 46 व्या वर्षी स्क्रिनवर आई झाल्याचं दाखवलं आहे. पण खऱ्या आयुष्यात तनीषानं लग्न केलं नाही. तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की तिला हा अनुभव खरंच करायचा आहे, पण तिच्या आयुष्यात कोणी नाही. 

तनीषा लग्न करायचं असून मुलही हवं आहे. पण तिचं अडतं इथे की तिला कोणी भेटलं नाही. 'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तनीषा याविषयी बोलताना म्हणाली की "ओह माय गॉड. आई होण्याचा अनुभव हा खूप सुंदर असतो. मला मुलं आवडतात. मला आयुष्यात हा अनुभव हवा आहे, पण दुर्दैवानं सध्या कोणीच नाही म्हणून मी ते स्क्रीनवर प्ले करून त्याचा अनुभव घेते. मला वाटतं की ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारूण खरोखरच फायदा घेत आहे. तो खूप चांगला अनुभव होता."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे तनीषा म्हणाली की "मला खरंच आई होण्याचा अनुभव हवा आहे. कारण खऱ्या आयुष्यात मी असं करु शकले नाही त्यामुळे मला वाटतं की मी स्क्रिनवर याचा फायदा घेतला आहे. मी बाळासोबत खूप मस्ती केली, त्याची छेड काढायची, त्याच्यासोबत खेळायची, सगळं काही मस्त सुरु होतं. आता प्रश्न आहे की दुसऱ्या भागाचं उत्तर देते महत्त्वाचं म्हणजे पहिली गोष्ट तर ही आहे की मला मुलगा शोधावा लागेल, मग मला त्या मुलाशी लग्न करावं लागेल. मला बाळाला जन्म द्यावा लागेल. या सगळ्यात वेळ लागेल. मला अजू मुलगा ही भेटला नाही."

हेही वाचा : 'अभिनेत्याला एका चित्रपटासाठी जितका पैसा मिळायचा, तितका आम्हाला...'; इंडस्ट्रीविषयी रवीना टंडनचा खुलासा

तनीषानं सांगितलं की "जर कोणी उगीच टीका करत असेल तर त्याकडे ती लक्ष देत नाही. पण जर खरंच काही असेल तर त्या टीकेकडे ती लक्ष देते आणि सुधारणा आणण्याचा प्रयत्न करते."