मुंबई : बिग बॉस 15 फेम तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा सर्वत्र चर्चेत आहेत. शोमध्ये असल्या पासूनच हे लव्हबर्ड्स सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्षवेधत आहेत.
तेजस्वी तिच्या 'नागिन 6' या शोमध्ये व्यस्त आहे, तर करण देखील त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे, तरीही दोघेही एकमेकांसाठी वेळ काढताना दिसतात आणि दोघांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.
करणच्या कुटुंबालाही तेजस्वी खूप आवडते. ती करणच्या कुटुंबीयांची बऱ्याचदा भेट घेताना दिसते. नुकताच करण कुंद्रा आपल्या कुटुंबासह तेजस्वीच्या घरी गेला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हे फोटो पाहून चाहते दोघांच्या लग्नाचा अंदाज बांधत आहेत.तेजस्वी प्रकाशच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला करण कुंद्रा त्याच्या आई-वडिलांसोबत पोहोचला होता.
करण कुंद्राचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो आपल्या आई-वडिलांसोबत तेजस्वीच्या घरी जाताना दिसत आहे.
करण कुंद्राचा त्याच्या आई-वडिलांसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते दोघांचं लग्न ठरलं का? असा प्रश्न विचारत आहेत.