मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खानच्या पहिल्या पुस्तकाचे 'द पॅरिल्स ऑफ बीईंग मॉडरेटली फेमस' लाँचिंग झाले. या लाँचिंग सोहळ्यात करीना कपूर खानने लाल रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता. या सोहळ्यासाठी पटौदी कुटुंबातील सर्वजण उपस्थित होते. मात्र सगळ्यांच्या नजरा करीनाच्या लुकवर होत्या.
या सोहळ्यात करीनाची सासू शर्मिला टागोर, नणंद सोहा अली खान, सैफ अली खान आणि सोहाचे पती कुणाल खेमू हे साध्या पोषाखात होते. मात्र करीनाचा लूक हॉट आणि बोल्ड होता. मात्र तुम्हाला माहीत आहे का करीनाने या सोहळ्यात घातलेल्या ड्रेसची किंमत किती आहे?
बॉलीवूड लाईफच्या बातमीनुसार करीनाने या सोहळ्यासाठी बीहू मोहापात्राने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता. या ड्रेसची किंमत तब्बल ५ लाख ४१ हजार रुपये इतकी आहे. हा असा पहिलाच इव्हेंट नाही जिथे करीनाने इतका महागडा ड्रेस घातला होता.
सोहाचे 'द पॅरिल्स ऑफ बीईंग मॉडरेटली फेमस' हे पुस्तक मंगळवारी लाँच करण्यात आले. हे पुस्तक पेंगुविन इंडियाने प्रकाशित केलेय. हे पुस्तक सोहाने लिहिलेल्या लेखांचा एक संग्रह आहे. या पुस्तकात पटौदी कुटुंबातील अनेकांचे न प्रकाशित झालेले फोटोही पाहायला मिळतील.