मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. संचारबंदी किंवा कडक लॉकडाऊन करणं हा काही यावरचा कायमचा उपाय नाही. याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. (Kedar Shinde says Raj Thackeray is only leader who is fighting for People of Maharashtra ) या मागण्या मान्य झाल्यामुळे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ट्विट करून राज ठाकरे यांचं आभार मानलं आहे.
राज ठाकरे आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या!! "अपुनने एकही मारा.. लेकीन सॅालिड माराके नाही" या काळात राजकारण न करता महाराष्ट्र जनतेच्या मागे उभा असलेला एकमेव "राजा"
@RajThackeray आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या!! "अपुनने एकही मारा.. लेकीन सॅालिड माराके नाही" या काळात राजकारण न करता महाराष्ट्र जनतेच्या मागे उभा असलेला एकमेव "राजा" @mnsadhikrut pic.twitter.com/9YJ4EhgbOt
— Kedar Shindde (@mekedarshinde) April 19, 2021
काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक मागणीपर ट्विट केलं होतं. यामध्ये लसींची संख्या वाढवण्यासाठी हाफकीन सारख्या संस्थांना लस निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी आपण केली होती. यासाठी मी पंतप्रधानांचा आभारी असून केंद्र सरकार या महामारीवर मात करण्यासाठी कायमच सहाय्य करेल अशी आशाही राज यांनी व्यक्त केली होती.
To increase the number of vaccines, I appealed to the PM to allow institutes like Haffkine to begin production. The PM graciously granted permission to Haffkine. I stand in deep gratitude and look forward to a constant support from the Center to overcome this pandemic.@PMOIndia
— Raj Thackeray (@RajThackeray) April 16, 2021
केंद्र सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सोमवारी घेतला. याअंतर्गत १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. लसीकरणाचा पुढचा टप्पा १ मेपासून सुरू होणार आहे. केंद्राने राज्ये, खासगी रुग्णालये, औद्योगिक आस्थापनांना थेट निर्मार्त्यांकडून लस खरेदी करण्यास मुभा दिली आहे. या निर्णयाचं राज्यातील सरकारनेही स्वागत केलं आहे. मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांचे आभार देखील मानले आहेत.