''सध्या दोनच अजितदादा चर्चेत आहेत; एक पवारांचे आणि दुसरे आमचे!...'' केदार शिंदे यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Kedar Shinde Post: सध्या राजकीय वातावरण हे पेटलेले दिसते आहे. त्यातून आता सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या पोस्टनं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सध्या दोनच अजितदादा चर्चेत आहेत. एक पवारांचे आणि दुसरे आमचे! असा उल्लेख त्यांनी या चित्रपटातून केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 6, 2023, 10:07 PM IST
''सध्या दोनच अजितदादा चर्चेत आहेत; एक पवारांचे आणि दुसरे आमचे!...'' केदार शिंदे यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष title=
July 6, 2023 | kedar shinde post goes viral says there are only two ajitdada in the scenario one of pawars and second is ours

Kedar Shinde Post: सध्या सर्वत्र 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट गाजतो आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. खासकरून महिलावर्गानं हा चित्रपट अतिशय उचलून धरला आहे. तरूणी पिढी आणि सोबतच पुरूषवर्गही या चित्रपटाला गर्दी करताना दिसत आहेत आणि या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद देताना दिसत आहेत. आता राज्यातील राजकीय वातावरणही तापलेले दिसते आहे. त्यातून यामध्ये केदार शिंदेची एक पोस्टही व्हायरल होते आहे. काही तासांपुर्वी शेअर केलेल्या त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी अजित पवारांचा उल्लेख केला आहे त्यामुळे सध्या चाहते त्यांच्या या पोस्टकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सध्या दोनच अजितदादा चर्चेत आहेत. एक पवारांचे आणि दुसरे आमचे! असा उल्लेख त्यांनी आपल्या पोस्टमधून लिहिताना केला आहे परंतु नक्की या पोस्टमध्ये त्यांनी काय लिहिलंय आणि ते दुसऱ्या कोणत्या 'अजितदादा' यांच्याबद्दल बोलत आहेत? 

काय आहे पोस्ट? 

''आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा. आयएनटी.. १९९३. माझी "बॅाम्ब एक मेरी जान" एकांकिका तेव्हा अंतिम फेरीत होती. निकालाची वेळ आणि त्याला लागणारा वेळ! यात हळूहळू पोरं पोरी आरडाओरडा करू लागली.. एकच जयघोष.. भुरे काका पडदा उघडा, पडदा उघडा!!! भुरे काका, ही त्याची माझी पहिली ओळख. पण पुढे व्यावसायिक रंगभूमीवर काम सुरू केलं आणि भुरे काकाचा तो, अजितदादा झाला. सध्या दोनच अजितदादा चर्चेत आहेत. एक पवारांचे आणि दुसरे आमचे! अजित भुरे!!

ही प्रस्तावना लिहिली अशासाठी की, #baipanbhaarideva #बाईपणभारीदेवा या सिनेमाच्या निर्मिती प्रक्रियेत या माणसाचा मोठा हात आहे. तो या सिनेमाचा सह निर्माता आहेच पण, या प्रवासात त्याची मला खुप साथ लाभली. गेली ४ वर्ष हा सिनेमा थांबला तेव्हा मला धीर देणारा अजितदादा होता. त्याआगोदर जेव्हा कुणीही निर्माता या सिनेमासाठी तयार होत नव्हता तेव्हा, केदार आपण हा सिनेमा करायचा.. असं म्हणणारा अजितदादा होता. सिनेमा कुणी एकटा करत नाही म्हणून त्याचं यशही एकट्याने घ्यायचं नसतं. ते कृतघ्नपणाचं लक्षण आहे. स्वामींचे आभार की, ते विविध रूपात माझ्या पाठीशी आहेत. आता उद्या आणखी एक महत्त्वाची व्यक्ती!! जीच्या मुळे ही कल्पना निर्माण झाली.''

हेही वाचा - ''Lust at First Sight...'' पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबतच्या रिलेशनशिपवर काय म्हणाली विद्या बालन?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या बाईपण भारी देवा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, सुरुची अडारकर, शिल्पा नवलकर, तूषार दळवी आणि शरद पोंक्षे अशा कलाकारांच्या भुमिकांनी या चित्रपटाला चार चांद लावले आहेत.