KGF फेम यशच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

KGF या चित्रपटात यशनं रॉकी भाईची भूमिका साकारली होती. दरम्यान, KGF 2 नंतर प्रेक्षक आता तिसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहेत. 

Updated: Jan 25, 2023, 03:12 PM IST
KGF फेम यशच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! title=

KGF To Have 5 Sequels : दाक्षिणात्य चित्रपटाचे KGF Chapter आजही लाखो चाहते आहेत. चित्रपटाच्या पहिला भागानं बक्कळ कमाई केली. त्यानंतर त्याचा दुसरा भाग म्हणजेच KGF 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट देखील ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 1 हजार 250 कोटींची कमाई केली. इतकंच काय तर दुसरा भाग पाहिल्यानंतर KGF चॅप्टर 3 ची चाहते आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, यशच्या (Yash) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 

KGF Chapter 3 या चित्रपटाची प्रतिक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला 2025 मध्ये सुरूवात होणार आहे. यासोबतच आणखी एक बातमी समोर आली आहे. चित्रपटाचे केवळ 2-3 नाही तर तब्बल 5 भाग प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. यश स्टारर चित्रपट केजीएफचे प्रोडक्शन हाउस हंबल फिल्म्सचे म्हणणे आहे की त्यांना हा चित्रपट एका ब्रँडप्रमाणे सीरिजमध्ये बनवायचा आहे. मात्र, यावेळी यशच नाही तर इतर अनेक कलाकारही यात सहभागी होणार आहेत. रिपोर्ट्सनुसार निर्माते चित्रपटाचे एकूण 5 भाग आणतील. प्रॉडक्शन हाऊसचे संस्थापक विजय किरगंडूर यांनी सांगितले की ते वेगवेगळ्या कलाकारांसोबत KGF चे पाच सिक्वेल बनवणार आहेत. आतापर्यंत, KGF 3 शी संबंधित जास्त माहिती दिलेली नाही. यश आता पुढच्या भागात असेल या बातमीवर त्यांनी दुजोरा दिलेला नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यश लवकरच इतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. यश सलार या चित्रपटात दिसणार आहे. तर याच चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेता प्रभास या चित्रपटातून कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, सलार या चित्रपटात यश आणि प्रभासला एकत्र दाखवत दिग्दर्शक या दोन्ही चित्रपटांमध्ये एक कनेक्शन दाखवणार आहे. सलार या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतरच यश KGF 3 साठी चित्रकरणाला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जाते. 2025 ला KGF 3 च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून 2026 मध्ये KGF 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

हेही वाचा : Bhau Kadam ची अशी अवस्था पाहून चाहते हैराण, व्हायरल फोटो पाहून तुम्हीही...

'KGF Chapter 2' चित्रपटाची कथा मुंबईत वाढलेल्या एका तरुणाची आहे, जो अंडरवर्ल्डमध्ये घुसल्यानंतर सोन्याच्या खाणी काबीज करण्यासाठी निघतो. चित्रपटाच्या स्पेशल इफेक्ट्स आणि संवादांची खूप प्रशंसा केली जात आहे. यश, श्रीनिधी शेट्टी, रवीना टंडन, प्रकाश राज आणि संजय दत्त या कलाकारांनी या चित्रपटात उत्कृष्ट काम केले आहे.