कियारा अडवाणी रुग्णालयात दाखल? नेमकं घडलं काय? तिच्या टीमनेच केला खुलासा

नुकतीच, कियारा अडवाणीची तब्येत खालावल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आली होती. यासंदर्भात तिच्या टीमनेच खुलासा केला आहे. नेमकं काय घडलं, पाहा.  

Updated: Jan 5, 2025, 12:16 PM IST
कियारा अडवाणी रुग्णालयात दाखल? नेमकं घडलं काय? तिच्या टीमनेच केला खुलासा title=
(photo credit - social media)

Kiara Advani Health Update: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या आगामी 'गेम चेंजर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दक्षिणात्य सुपरस्टार राम चरणसोबतचा कियारा अडवाणीचा हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कियारा आणि राम चरण हे त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. प्रमोशनचा हा सपाटा सुरु असतानाच अचानक शनिवारी एक वेगळीच बातमी समोर आली. कियारा अडवाणी शनिवारी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही अशी माहिती समोर आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. त्यातच कियाराची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ती त्या कार्यक्रमाला हजेरी लावू शकली नाही आणि अचानक तब्येत बिघडल्यामुळे तिला हॉस्पिटल मध्ये दाखल केले असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता यावर कियाराकडून खुलासा करण्यात आला आहे.

नेमकं घडलं काय?

कियाराला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी तिच्या टीमकडे विचारणा केली. कियाराच्या टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार, कियाराच्या तब्येतीत आता सुधारणा झाली आहे. तसेच कियाराची तब्येत खालावल्याच्या वृत्ताला दुजोरा टीमने दिला. मात्र तिला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं नव्हतं असंही टीमने स्पष्ट केलं. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अधिक धावपळ झाल्याने तिला थकवा जाणवत होता. म्हणूनच डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिल्याने तिने प्रमोशनल इव्हेंटला दांडी मारली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कियाराला राम चरणसोबत 'गेम चेंजर'च्या प्रेस मीटला हजर राहणार होती. मात्र प्रकृती खालावल्याने ती या कार्यक्रमाला आलीच नारही. 

'बिग बॉस 18' मध्ये पोहोचली कियारा

शुक्रवारी सलमान खानच्या 'बिग बॉस 18' या शो मध्ये 'वीकेंड का वार' या एपिसोडमध्ये कियारा झळकली होती. त्यांनी या शो मधील स्पर्धकांशी संवाद साधला. कियाराचे बिग बॉसच्या सेटवरील फोटोज आणि व्हिडीओज सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यांना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. 'गेम चेंजर' या चित्रपटाविषयी सांगायचं झाल्यास, तर हा चित्रपट 10 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक पॉलिटीकल ड्रामा असून त्याचं दिग्दर्शन एस. शंकर यांनी केले आहे.

 

सेन्सॉर बोर्डाकडून U/A सर्टिफिकेट

सेन्सॉर बोर्डाने 'गेम चेंजर' चित्रपटाला U/A सर्टिफिकेट दिलं आहे. या चित्रपटामध्ये सेन्सॉर बोर्डाने 2 मोठे बदल करण्यास सांगितलं आहे. 2 तास 45 मिनिटांच्या या चित्रपटात राम चरण एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. कियारासुद्धा या चित्रपटातून पोलीस अधिकारी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोघांबरोबरच चित्रपटामध्ये समुथिरकानी, एस.जे सूर्य, श्रीकांत, प्रकाश राज आणि सुनील या सारखे अनेक कलाकार झळकणार आहेत.