मुंबई : टीव्ही अभिनेता नकुल मेहताची पत्नी जानकी पारेखने एक पोस्ट शेअर करत त्यांचा 11 महिन्यांचा मुलगा सुफीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. सुफीनंतर आता आणखी एका टीव्ही जोडप्याने त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांचा 4 महिन्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
किश्वर मर्चंटने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला मुलगा निरवैरला कोविडची लागण झाल्याचं सांगितलं. मुलाला कोरोना झाल्याची माहिती देत असताना किश्वरने आधी पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर ती म्हणाली, '5 दिवसांपूर्वी निरवैरच्या नैनीला कोरोना झाला त्यानंतर आमची मेड संगीता देखील कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. दोघी सध्या क्वारंटाईन आहेत. आमच्यासोबत राहत असलेला सुयशचा मित्र देखील पॉझिटिव्ह आहे..'
'यापोक्षाही वाईट म्हणजे निरवैर देखील कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे निरवैर काळजी घेण्यासाठी आमच्याकडे कोणी नाही...' किश्वरची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.