मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींच्या आवाजाची जादू संपूर्ण देशावरच नाही तर जगभरात आहे. त्या जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांचा आवाज कायम प्रत्येकाच्या स्मरणात राहील.
लतादीदींनी एक आईचं मन जाणून तब्बल 8 तास उभं राहून लुका छुपी हे गाणं गायलं होतं. त्यानंतरही लतादीदींनी गाणी रेकॉर्ड केली. लता मंगेशकर यांची शेवटची दोन गाणी रेकॉर्ड कोणती झाली याबद्दल आज आपण जाणून घेणार आहेत.
'सौगंध मुझे इस मिट्टी का' हे गाणं 30 मार्च 2019 मध्ये लतादीदींनी रेकॉर्ड केलं होतं. त्यांनी हे गाणं भारतीय सैन्य दलाला समर्पित केलं होतं. त्यापूर्वी लतादीदींनी 12 डिसेंबर 2018 मध्ये इशा अंबानीच्या लग्नासाठी 'गायत्री मंत्र' रेकॉर्ड केला होता.
लतादीदींनी 35 भाषांमध्ये 30 हजारहून अधिक गाणी गायली आहेत. लुका छुपी, ए मेरे वतन के लोगो ही गाणी तर डोळ्यात अश्रू आणणारी आहेत. लतादीदींचा आवाज प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात राहणार आहे.
लतादीदी यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे परिवार आणि मनोरंजन विश्वातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.