मादाम तुसाँमध्ये 'अनारकली'ही दिसणार!

मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये आता आणखी एका मेणाच्या पुतळ्याचा समावेश होणार आहे... हा पुतळा असेल आजही लाखो दिलों की धडकन असणाऱ्या 'अनारकली'चा... अर्थात मधुबालाचा...   

Updated: Jul 26, 2017, 02:43 PM IST
मादाम तुसाँमध्ये 'अनारकली'ही दिसणार! title=

नवी दिल्ली : मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये आता आणखी एका मेणाच्या पुतळ्याचा समावेश होणार आहे... हा पुतळा असेल आजही लाखो दिलों की धडकन असणाऱ्या 'अनारकली'चा... अर्थात मधुबालाचा...   

मधुबालाचे आजही अनेक दिवाने आहेत... मधुबालानं तिच्या नितांत सौंदर्यानं आणि अभिनयानं 'मुघल-ए-आझम'मधली अनारकली अजरामर केली... आता मधुबालाचा 'अनारकली'च्या रुपातला पुतळा आता दिल्लीतल्या 'मादाम तुसाँ वॅक्स म्युझियम'मध्ये बसवला जाणार आहे.

या वर्षाच्या अखेरीस हा पुतळा तयार होणार आहे. दिल्लीच्या या वॅक्स म्युझियममध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आशा भोसले अशा मान्यवरांचे मेणाचे पुतळे आहेत. आता त्यात मधुबालाचाही समावेष होणार आहे.