Madhubala's Love Story: मधुबाला (Madhubala) यांच्या सौंदर्यानं अनेकांना वेड लावलं होतं. मधुबाला यांच्या प्रेमात शम्मी कपूर (Shammi Kapoor) पासून अनेक कलाकार प्रेमात वेडे झाले होते. मधुबाला यांचे लाखो चाहते होते, पण दुर्दैवाने त्यांना हवे तसे प्रेम किंवा पाठिंबा त्यांना कधीच मिळाला नाही. त्यांच्या वडिलांचा त्यांचा आणि दिलीप कुमार यांचा विवाह करून देण्यास विरोध होता, तर दुसरीकडे कमाल अमरोही यांच्याशी विवाह करून देण्यास ते तयार होते. अनेक वेळा हार्टब्रेक झाल्यानंतर अखेर मधुबाला यांनी किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं. पण शेवटच्या क्षणी जेव्हा त्या आजारी होत्या तेव्हा किशोर कुमार यांनी देखील मधुबाला यांची साथ सोडली. 23 फेब्रुवारी 1969 रोजी वयाच्या 36 व्या वर्षी मधुबाला यांनी जगाचा निरोप घेतला.
'साकी' या चित्रपटाच्या सेटवर मधुबाला यांना डान्स हा नृत्यसम्राट पं.गोपीकृष्ण यांनी शिकवले होते. ते मधुबालाच्या प्रेमात तर नव्हतेच, पण मधुबाला यांच्या सौंदर्यानं त्यांना वेड लावले होते. जेव्हा शूटिंग संपली तेव्हा मधुबाला यांनी गोपीकृष्ण यांना नाश्ताची ऑफर दिली. हे ऐकताच गोपीकृष्ण इतके आनंदी झाले की त्यांनी मधुबाला यांच्यासोबत नाश्ता करण्यास लगेच होकार दिला. इतकंच काय तर नाश्तामध्ये काय आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. एकत्र नाश्ता करायला बसले असता मधुबाला यांच्याकडे गोपीकृष्ण एकटक पाहू लागले. एवढंच नाही तर त्यांना भानही राहिले नाही की ते काय खात आहेत. तो नाश्ता हा मांलाहारी होता, पण गोपीकृष्ण यांना हे कळले नाही. नाश्त्यात चिकन आणि मटण खाल्ल्याचे समजल्यानंतर ते अस्वस्थ झाले. कारण गोपीकृष्ण हे शाकाहारी होती.
हेही वाचा : S*X Education चा क्लास सुरू असताना शिक्षक 10 मिनिटं उभे राहिले आणि नंतर ...अभिनेत्यानं केला मोठा खुलासा
1949 मध्ये बॉम्बे टॉकीजच्या बॅनरखाली 'महल' हा चित्रपट बनला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कमाल अमरोही यांनी केले होते. सुरुवातीला सुरैया यांना या चित्रपटासाठी कास्ट केले जाणार होते, परंतु स्क्रीन टेस्टनंतर मधुबाला यांची मुख्य भूमिकेत निवड करण्यात आली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मधुबाला आणि कमाल अमरोही एकमेकांच्या जवळ आले होते. त्यांच्या नात्यावर मधुबालाचे वडील खूप खूश होते. ते म्हणाले होते, 'या दोघांनी नंतर लग्न केले तर मला आक्षेप नाही.