ख्रिसमसचे फोटो टाकण्यावरुन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता ट्रोल; स्पष्टच उत्तर देत म्हणाला....

सगळीकडे सध्या ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळतोय. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला “आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…” असा प्रश्न विचारण्यात आलाय. त्यावर त्याने दिलेलं उत्तर नक्कीच विचार करायला लावणारं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 26, 2024, 10:34 AM IST
ख्रिसमसचे फोटो टाकण्यावरुन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता ट्रोल; स्पष्टच उत्तर देत म्हणाला....  title=

Maharashtrachi Haryajatra Fame : 25 डिसेंबरपासून सगळीकडे नाताळचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रत्येक का ख्रिसमसच्या झगमगाटाचा आनंद घेताना दिसत आहे. यामध्ये मराठमोळे कलाकार देखील आहेत. अनेक मराठी कलाकार आपले ख्रिसमसचे फोटो पोस्ट करताना दिसतात. पण याच फोटोंवरुन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता ओंकार राऊतला ट्रोल करण्यात आलं. यावेळी ओंकारने दिलेल्या सडेतोड उत्तरावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. 

अभिनेता ओंकार राऊत काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'च्या संपूर्ण टीमसोबत परदेश दौऱ्यावर गेला होता. लंडनमध्ये मराठी प्रेक्षकांसाठी हास्यजत्रेच्या टीमचे काही प्रयोग आयोजित केले होते. नोव्हेंबर महिन्यापासून ख्रिसमस सेलिब्रेशनला सुरुवात झाल्याच त्याच्या पोस्टमध्ये दिसतंय. यातील काही फोटो ओंकारने 25 डिसेंबर ख्रिसमसच्या दिवशी पोस्ट केले आणि इंस्टाग्रावरुन चाहत्यांना नाताळ सणाच्या शुभेच्छा देखील दिल्या. पण या पोस्टमुळे ओंकारला लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली.

विचारला खोचक प्रश्न 

ओंकारने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यानंतर त्याला “भावा, कधी आपल्या सणांचे फोटो टाकलेस का?” असा प्रश्न विचारला. यावर ओंकारने अतिशय सडेतोड आणि स्पष्ट असं उत्तर दिलं आहे. 

ओंकारने दिलेलं उत्तर 

“हो रे! मी जे सण साजरे करतो त्याचे फोटो कधी पोस्ट करतो कधी नाही! मुळात प्रत्येक सण हा आनंद पसरवतो. त्यामुळे हा सण आपला तो सण त्यांचा अशी घाणेरडी वृत्ती नको. लहानपणापासून मी गणपतीत मोदक खाल्ले आहेत, दिवाळीत फराळ, होळीला पुरणपोळी, ख्रिसमसला सांताकडून येणाऱ्या गिफ्ट्सची वाट बघितली आहे. ईदला माहिमला जाऊन मालपोहे खाल्ले आहेत, खूप प्रसन्नतेने गुढीपाडवा सुद्धा साजरा केलाय आणि त्याच उत्साहात ३१ डिसेंबर सुद्धा साजरा करतो!! म्हणून हे असले प्रश्न परत कोणालाही विचारू नकोस! Merry Christmas!! सांता तुला गिफ्ट म्हणून सुविचार देवो!!!”

ओंकारप्रमाणे दिलेलं हे उत्तर अनेकांना आवडलं आहे. काहींनी थम देऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर काहींनी कमेंट करुन. यामध्ये अभिनेता पृथ्वीक प्रताप काही मागे राहिलेला नाही. त्याने या उत्तराचा स्क्रिनशॉर्ट काढून स्टोरीवर शेअर केला आहे. 

ओंकार राऊतप्रमाणेचअभिनेत्री वनिता खराने देखील सोशल मीडियावर आपले ख्रिसमसचे फोटो पोस्ट केले आहेत.