धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दमानियांचं 'ब्रह्मास्त्र'?, गौप्यस्फोटानं राजकीय भूकंप येणार?

Anjali Damania On Dhananjay Mundes Resignation: बीड प्रकरणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या अंजली दमानियांनी आता मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिलाय. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 3, 2025, 09:14 PM IST
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दमानियांचं 'ब्रह्मास्त्र'?, गौप्यस्फोटानं राजकीय भूकंप येणार? title=
धनंजय मुंडे राजीनामा

Anjali Damania On Dhananjay Mundes Resignation: अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलंय. आपण मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचंही दमानियांनी सांगितलंय. आपल्या पत्रकार परिषदेनंतर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला लागणार, असा विश्वासही दमानियांनी व्यक्त केलाय. त्यामुळे अंजली दमानिया आता कुठलं ब्रम्हास्त्र बाहेर काढणार, याची उत्सुकता लागली आहे. 

बीड प्रकरणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या अंजली दमानियांनी आता मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिलाय. धनंजय मुंडेंविरोधात मोठं भ्रष्ट्राचाराचं प्रकरण बाहेर काढणार असल्याचा दावा अंजली दमानियांनी केलाय. भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर काढल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावाच लागेल, असंही दमानिया म्हणाल्यात. लाभाच्या पदावरुन यापूर्वी दमानियांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. मात्र यापेक्षा मोठा गौप्य़स्फोट करणार असल्याचे संकेत दमानियांनी दिलेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी यावरून दमानियांना टार्गेट केलंय. दमानियांकडे माहिती कुठून येते, त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत का, असा सवाल चव्हाण यांनी केलाय. इतकंच नाही तर पुरावे असल्यास तपास यंत्रणांना देण्याची मागणीही सूरज चव्हाण यांनी केलीय.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया सातत्यानं आवाज उठवत आहेत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत दमानियांनी अजित पवारांची भेट घेतली होती. दमानियांच्या सततच्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झालीय. त्यातच आता पुन्हा एकदा अंजली दमानियांनी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दिलाय. पत्रकार परिषदेत अंजली दमानिया नेमका कुठला गौप्यस्फोट करतात हे पाहावं लागणार आहे. दमानिया कुठलं ब्रम्हास्त्र बाहेर काढणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. दमानियांच्या ब्रम्हास्त्रानंतर खरंच मुंडेंचा राजीनाम्यासाठी दबाव वाढणार का, हे पाहणं महत्त्वाचंय.

भ्रष्टाचाराचे पुरावे भगवानगडाला देणार 

धनंजय मुंडेंना भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्रींनी पाठिंबा दिला होता. त्या पाठिंब्यावरुन महंत नामदेवशास्त्री टीकेचे धनी ठरले होते. धनंजय मुंडेंना भगवानगडानं पाठिंबा देऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया प्रचंड नाराज झाल्यात. लाभाच्या पदाच्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर आरोप झाले त्यांना पाठिंबा देणं योग्य नसल्याचं दमानिया म्हणाल्यात. भगवानगडानं म्हणजेच नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंना दिलेला पाठिंबा मागं घ्यावा असं आवाहन अंजली दमानियांनी केलंय. धनंजय मुंडेंनी मंत्रिपदावर राहण्याची नैतिकता गमावल्याचा आरोप अंजली दमानियांनी केलाय. येत्या काळात ज्या भगवानगडानं धनंजय मुंडेंना पाठिंबा जाहीर केला होता. तोच भगवानगड धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.