पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचे नाव; पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत 'हे' देश

World Military Power 2025 : ग्लोबल फायरपॉवरने जगातील सर्वात शक्तिशाली सामर्थ्य असलेल्या देशाची यादी जाहीर केली. या यादीत भारताने पहिल्या टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 3, 2025, 07:14 PM IST
 पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचे नाव; पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत 'हे' देश title=

Powerful Military in the World :   ग्लोबल फायरपॉवरने जगातील सर्वात शक्तिशाली सामर्थ्य असलेल्या देशाची यादी जाहीर केली आहे. पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताने पहिल्या टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे. मात्र, या यादीत पाकिस्तानचे स्थान घसरले आहे. फुशारक्या मारणाऱ्या पाकिस्तानची पुन्हा एकदा जागतिक पातळीवर फजिती झाली आहे.

जगातील सर्व देशांच्या सैन्याच्या फायर पॉवरचे मूल्यांकन करण्यासाठी ग्लोबल फायरपॉवर ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली आहे. जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी ही संस्था 60 पेक्षा जास्त पॅरामीटर्सच्या आधारे ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स तयार करते. ज्यामध्ये लष्करी तुकड्या, आर्थिक स्थिती, रसद क्षमता आणि भौगोलिक स्थान आणि तांत्रिक प्रगती यांचा समावेश होतो. या आधारावर जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  ग्लोबल फायरपॉवर यादीत भारत चौथ्या स्थानावर आहे.

ग्लोबल फायरपॉवर ऑर्गनायझेशनच्या या क्रमवारीत जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर, रशिया दुसऱ्या स्थानावर आणि चीन तिसऱ्या स्थानावर आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही भारत स्थानावर स्थिर आहे. 
अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली लष्करी शक्ती असलेला देश आहे. अत्याधुनिक क्षमता, आर्थिक ताकद आणि जागतिक प्रभावामुळे अमेरिका अव्वल स्थानावर कायम आहे. 

2024 मध्ये पाकिस्तान हा देश फायरपॉवर रँकिंगमध्ये 9व्या स्थानावर होता. मात्र, 2025 च्या यादीत पाकिस्तान 12व्या स्थानावर घसरला आहे. यामुळे पुन्हा एकदा जागतिक पातळीवर पाकिस्तानची पीछेहाट झाली आहे.  या यादीत भूतान सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.

जगातील शक्तिशाली देशांची यादी

अमेरिकेचा पॉवर इंडेक्स स्कोअर -0.0744 आहे.
रशिया  या यादीत रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. रशियाचा पॉवर इंडेक्स स्कोअर 0.0788 आहे. 
चीनचा पॉवर इंडेक्स स्कोअर ०.०७८८ आहे. 
लष्करी उपकरणे, आधुनिक शस्त्रे आणि सामरिक स्थिती यामुळे भारत चौथ्या क्रमांकावर आहे. पॉवर इंडेक्स स्कोअर 0.1184 आहे. 
दक्षिण कोरियाचा पॉवर इंडेक्स स्कोअर 0.1656 आहे. 
युनायटेड किंगडमचा पॉवर इंडेक्स स्कोअर 0.1785 आहे. 
फ्रान्सचा पॉवर इंडेक्स स्कोअर 0.1878 आहे. 
जपानचा पॉवर इंडेक्स स्कोअर 0.1839 आहे. 
तुर्कियेचा पॉवर इंडेक्स स्कोअर ०.१९०२ आहे.
इटलीचा पॉवर इंडेक्स स्कोअर 0.2164 आहे.