विकृत शिक्षक! शौचालयाच्या खिडकीतून काढायचा महिलांचे अश्लिल व्हिडीओ; मोबाईलमध्ये सापडले 20 VIDEO

Crime News : नागपुरात एका शिक्षकाची विकृत वृत्ती समोर आली आहे. तो लपून शौचालयाच्या खिडकीतून महिलांचे अश्लिल व्हिडीओ काढायचा.

नेहा चौधरी | Updated: Feb 3, 2025, 06:46 PM IST
विकृत शिक्षक! शौचालयाच्या खिडकीतून काढायचा महिलांचे अश्लिल व्हिडीओ; मोबाईलमध्ये सापडले 20 VIDEO title=

Crime News : नागपुरात शिक्षकाचे विकृत कृत्य समोर आल्यामुळे खळबळ माजलीय. नागपूर जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षक शौचालयाच्या खिडकीतून महिलांचे अश्लिल व्हिडीओ काढायचा. या प्रकरणात पोलिसांनी त्या शिक्षकाला अटक केली. मंगेश खापरे असं त्या विकृत शिक्षकाचं नाव असून तो 38 वर्षाचा आहे. तो दिघोरी इथल्या एका शाळेत कलाशिक्षक आहे. शुक्रवारी नागपुरातील सिताबर्डी परिसरातील विदर्भ साहित्य संघ संकुलात एक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अशी आली घटना समोर!

विदर्भ साहित्य संघ संकुलात कार्यक्रमदरम्यान एक महिला स्वच्छतागृहात गेली असता नराधम शिक्षक मंगेशने खिडकीतून तिचा व्हिडीओ काढला. महिलेला खिडकीत काहीतरी हालचाल जाणवली, त्यामुळे तिला हा प्रकार लक्षात आला. तिने आरडाओरड केल्याने तिथे असलेले लोक जमा झाले आणि मंगेशला रंगेहाथ पकडले. यावेळी त्याचा मोबाईल तपासला असताना धक्कादायक गोष्ट समोर आली. त्या महिलेसोबत मंगेशने महिलांचे स्वच्छतागृहातील 8 ते 10 महिलांचे अश्लिल व्हिडीओ काढले होते. नागरिकांनी या घटनेची माहिती सिताबर्डी पोलिसांना दिली. पोलिसांनी मंगेशला ताब्यात घेतलं. दरम्यान महिलेचा तक्रारीवरून पोलिसांनी त्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

 

हेसुद्धा वाचा - Crime News : पोलीस ठाण्यासमोर मारहाणीत तरुणाचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

 

20 आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपीच्या मोबाईल फोनमध्ये पोलिसांना 20 आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले आहेत. त्यांनी सांगितले की, खापरे गेल्या वर्षी एका कार्यक्रमात अशाच प्रकारच्या विकृत कृती करताना पकडला गेला होता. त्याप्रकरणात आरोपी मंगेश खापरे याला 2024 मध्येदेखील अटक झाली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या खासदार औद्योगिक महोत्सवादरम्यान स्वच्छतागृहात त्याने महिलांचे व्हिडीओ काढले होते. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणी असा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली होती. त्याला त्यानंतर संबंधित शाळेतून काढण्यातून टाकण्यात आले होते. या घटनेनंतर तो दिघोरीतील शाळेत कलाशिक्षक म्हणून कामाला लागला होता. त्याचा मोबाईल तपासला असता त्यातील अनेक व्हिडीओ हे 2022 मधील आहेत.