Sonakshi Sinha : मुंबईतील प्रॉपर्टीच्या किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अनेक बॉलिवूड सिलेब्रिटींनी मुंबईतील विविध भागांमधील रिअल इस्टेटमध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक करून घर तसेच कमर्शियल ऑफिसेस खरेदी केली आहेत. मध्यंतरीच बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांनी काही वर्षांपूर्वी 31 कोटींना विकत घेतलेला अंधेरीतील आलिशान फ्लॅट तब्बल 83 कोटींना विकला होता. आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने देखील मुंबईतील तिचा आलिशान बंगला विकून कोट्यवधींचा फायदा करून घेतला आहे.
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने मुंबईच्या बांद्रा येथील आलिशान बंगला तब्बल 22.50 कोटींना विकला आहे. रियल एस्टेट एडवाइजरी कंपनी स्क्वायरने सांगितल्यानुसार सोनाक्षीने 81-ऑरिएट येथे असणारं आलिशान घर विकलं आहे. एमजे शाह ग्रुपचा हा प्रोजेक्ट असून हा तब्बल 4.48 एकरावर पसरलेला आहे. सोनाक्षी सिन्हाच हे घर 4BHK चं आहे.
एका रिपोर्टनुसार सोनाक्षीच्या अपार्टमेंटचे कार्पेट क्षेत्र हे 391.2 चौरस मीटर (जवळपास 4,211 चौरस फूट) आहे. तर याचा बिल्ट-अप एरिया 430.32 चौरस मीटर (अंदाजे 4,632 चौरस फूट) इतका आहे. स्क्वायर यार्ड्सने सांगितल्यानुसार या व्यवहारात 1.35 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे.
हेही वाचा : ममता कुलकर्णीला होती राज्यसभेची ऑफर? मुंबईत पळून येण्याची वेळ का आली? धक्कादायक खुलासा!
कंपनीने सांगितल्यानुसार हे अपार्टमेंट सोनाक्षी सिन्हाने मार्च 2020 मध्ये 14 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. तर 2025 मध्ये तिने हे अपार्टमेंट तब्बल 22.50 कोटींना विकलं. त्यामुळे सोनाक्षीला या व्यवहारातून मोठा फायदा झाला असून आकडेवारी पाहिली तिने हे अपार्टमेंट 61 टक्के जास्त किंमतीला विकलं आहे. सोनाक्षी सिन्हाचे 81-Ort मध्ये आणखी एक अपार्टमेंट आहे.
सोनाक्षी सिन्हा सह या भागात बॉलिवूडमधील सुनील शेट्टी, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यासारख्या बॉलिवूड सुपरस्टार्सची घर आहेत. केएल राहुल आणि अथिया शेट्टी सारख्या क्रीडा सेलिब्रिटींनीही या भागात घरं खरेदी केली आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने २०१० मध्ये सलमान खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'दबंग' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. गेल्या काही वर्षांत तिने 'लूटेरा', 'मिशन मंगल' सारख्या चित्रपटांमध्ये आपली छाप सोडली. तर गेल्यावर्षी संजय लीला भंसाली यांच्या 'हिरामंडी' या वेब सीरिजमध्ये ती महत्वाच्या भूमिकेत होती.