IND VS ENG 5th T20 : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात खेळवण्यात आलेली 5 सामन्यांची टी 20 सीरिज टीम इंडियाने 4-1 ने आघाडी घेऊन जिंकली. रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाने इंग्लंड संघाचा 150 धावांनी पराभव करत धुव्वा उडवला. यात टीम इंडियाने पहिल्या डावात तुफान फटकेबाजी करून 247 धावा केल्या आणि विजयाचे आव्हान पूर्ण करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडला 97 धावांवर रोखले. या दरम्यान टीम इंडियाकडून फलंदाजीत अभिषेक शर्मा आणि गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) यांनी दमदार कामगिरी केली. दुखापतीनंतर कमबॅक करणाऱ्या शमीने इंग्लंडच्या 3 विकेट्स काढून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड नावावर केला.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर दुखापतीच्या कारणामुळे गोलंदाज मोहम्मद शमी जवळपास 13 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आलेली. यातून आता शमी पूर्णपणे फिट होऊन मैदानात परतला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात निवड झालेल्या शमीने इंगलंड विरुद्ध चौथ्या टी 20 सामन्यातून पुनरागमन केले. मात्र पुण्यात झालेल्या सामन्यात त्याला एकही विकेट घेणं शक्य झालं नव्हतं. मात्र ही कसर शमीने मुंबईत पूर्ण केली. रविवारी मुंबई झालेल्या इंग्लंड विरुद्ध सीरिजमधील शेवटच्या सामन्यात शमीने तब्बल 3 विकेट्स घेतल्या. 2.3 ओव्हर गोलंदाजी करून 25 धावा देत त्याने 3 विकेट्स काढल्या.
हेही वाचा : दिग्गज क्रिकेटर्सच्या लाडक्या लेकी सध्या काय करतात? कोणी अभिनेत्री तर कोणी CA
शमीने रविवारी इंग्लंडच्या 3 विकेट घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 450 विकेट्स पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा अथवा गोलंदाज ठरला असून यापूर्वी अनिल कुंबळे (956), अश्विन (765), हरभजन सिंह (711), कपिल देव (687), जहीर खान (610), रविंद्र जडेजा (597), श्रीनाथ (551) यांचा देखील या यादीत समावेश आहे. यासह शमीने पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरच्या विक्रमला मागे टाकलं आहे. शोएब अख्तरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 444 विकेट्स आहेत. पण शमीने 450 विकेट्सचा टप्पापूर्ण केला आहे.
संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती
फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड