Dhananjay Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणात सुरेश धस आणि अंजली दमानिया या वारंवार धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत आहे. धनंजय मुंडेंवर या प्रकरणात अनेक आरोप लावण्यात आलंय. या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आलीय. पण दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बीड जिल्हा नियेाजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव झाल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर करण्यात आला आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांची चौकशीचे आदेश अजित पवार यांनी दिलीय. तीन सदस्यीय चौकशी पथक समिती गठण करुन एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश अजित पवारांनी दिलीय.
बीड जिल्हा नियेाजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव झाला असून या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधकांकडून धनंजय मुंडेंवर करण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहिला मिळत आहे. नियोजन समितीची बैठक होताच आता 2023-24 आणि 2024-25 सालच्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी करण्यात यावी. त्यासाठी विशेष चौकशी पथक गठीत करण्यात आली आहे. यामध्ये धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे अध्यक्ष असतील तर अर्थ आणि सांख्यिकी संचलनालय अपर संचालक म.का. भांगे आणि जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी या तीन सदस्यीय पथक समिती चौकशी करणार आहे.
हे पथक मंजूर झालेल्या कामांची सद्यस्थिती, त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेश तसेच प्रशासकीय मान्यता दिलेली कामे, त्याकरिता निधी वितरण याची चौकशी करणार आहेत. या समितीने एका आठवड्यात हा अहवाल सादर करावा असे आदेश राज्याचे अवर सचिव सुषमा कांबळी यांनी दिले आहेत.