मुंबई : सुप्रसिद्ध बॉलीवूड सिंगर महेंद्र कपूरचे ग्रँड सन सिद्धांत कपूर मध्ये त्यांची छाप पहायला मिळत आहे. कारण त्यालाही संगीत क्षेत्रात काहीतरी नवीन करून दाखवायचं होतं. म्हणूनच, कोरोना काळात संगीतकार सिद्धांत कपूरने आंतरराष्ट्रीय अल्बमसाठी विदेशात जाऊन एक अभूतपूर्व संगीत रचना तयार केली. सिद्धांतने प्रसिद्ध हॉलिवूड संगीतकार जॉन ॲश्टन थॉमस यांच्यासोबत 160 हून अधिक मोठ्या हॉलिवूड फीचर फिल्म्ससाठी काम करून एक आदर्श प्रस्थापित केला आहे. जॉन ॲश्टन थॉमस या हॉलिवूड संगीतकाराने सुपरहिट फिल्म्स ब्लॅक पँथर आणि कॅप्टन मार्व्हलसाठी ऑस्कर-विजेते स्कोअर दिले आहेत.
सिद्धांत आणि जॉन यांना 4,400 मैलांचे अंतर आणि कोविड-19 रोखू शकले नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी सक्सेसफुल संगीत रचना केली. एनर्जिने ने भरपूर अशा ह्या दोन्ही संगीतकारानी मिळून व्हिडिओ कॉल च्या मदतीने 6 अद्वितीय ट्रॅक तयार केले जे आता संगीतमय दुनियेत दाखल झाले आहेत. 'गेटवे टू इंडिया' या अल्बममध्ये 'गेटवे टू इंडिया' या शीर्षक गीतासह ओपनिंग सेरेमनी , जयपुर पैलेस , हिमालयन जर्नी , फ़्लाइंग ओवर ताज और डेजर्ट क्वेस्ट ट्रैक या गाण्यांचा समावेश आहे. ही गाणी ऐकून श्रोत्यांना भारतातील विविध पैलूंचा अनुभव घेता येईल.
दुर्दैवाने ह्या संगीतमय प्रवासात जॉन ॲश्टन थॉमस यांचे निधन झाले.
आता सर्व जवाबदारी सिद्धांत वर येउन ठेपली होती. थॉमसयांच्या संगीतातील ती जादू कायम ठेवून लंडनच्या प्रतिष्ठित ॲबे रोड स्टुडिओ आणि मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये संपूर्ण ऑर्केस्ट्रासह सिद्धांत ने रेकॉर्डिंग पूर्ण केली. 'गेटवे टू इंडिया' ह्या आंतरराष्ट्रीय अल्बम मध्ये भारतीय संगीत आणि पाश्चात्य वाद्यवृंदाच्या मदतीने भारतीय संगीताचा आस्वाद श्रोत्याना देण्यात येईल. हा अस्वाद घेताना महान संगीतकार थॉमस यांच्या संगीताची जाणीव नक्कीच करून देइल. प्रत्येक रेकॉर्डिंगपूर्वी, सिद्धांत त्यांच्या पोर्ट्रेटसमोर त्यांना नमन करून आपल्या कामाची सुरुवात करत असे
ऑडिओनेटवर्क म्युझिक कंपनीचे संस्थापक अँड्र्यू सन्क्स यांनी या अल्बमला पसंती देत ह्या अल्बम ला अतुलनीय शिखरावर पोहचवन्याची खात्री देखिल दिली. ह्या अल्बम ला पूर्णत्व देण्यासाठी उत्कृष्ट संगीतकार आणि एक मजबूत टीम तयार केली. ब्रिटिश एमी पुरस्कार विजेते गेविन ग्रीनवे यांनी कुशलतेने ऑर्केस्ट्राचे संचालन केले. अल्बमला ग्रॅमी-विजेता साउंड इंजिनियर रेन स्वान यांनी अंतिम रूप दिले.
'गेटवे टू इंडिया' बद्दल बोलताना, सिद्धांत कपूर म्हणाला, "हा प्रकल्प माझ्यासाठी स्वप्नापेक्षा कमी नव्हता. मी ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकमध्ये माझे गुरू जॉन ॲश्टन थॉमस यांच्यासोबत दीर्घकाळ संगीताचा अभ्यास केला. काही वर्षांपूर्वी, जेव्हा मला म्युझिक कंपनी ऑडिओनेटवर्ककडून 'गेटवे टू इंडिया'वर जॉन ॲश्टन थॉमससोबत प्रोजेक्ट करण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा ते माझ्यासाठी आव्हानात्मक होते. कोविड काळात संपूर्ण जबाबदारीने व्हिडिओ कॉल्सद्वारे सहा ऑडिओ ट्रॅकवर काम केले. हे जादुई संगीत मी माझे मास्टर जॉन ॲश्टन थॉमस यांना समर्पित करतो.