मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी सोशल मीडियामुळे नेहमीच चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मलायका महिलांना घटस्फोट घेण्याचा विचार कधी करावा या विषयी सांगितलं आहे.
मलाकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायका बॉलिवूडची बेबो करीना कपूरच्या (Kareena Kapoor Khan) शोमध्ये गेल्याचे दिसत आहे. यावेळी घटस्फोट घेण्याचा निर्णय महिलेनं कधी घ्यायला हवा याचा सल्ला दिला आहे.
यावेळी मलायका बोलते की, 'तुम्ही दु:खी वैवाहिक जीवनात असाल आणि तुम्ही घटस्फोट घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही विभक्त व्हा. हे तुम्ही सन्मानानं, स्वाभिमानानं केलं पाहिजे. पण कोणी तुमच्यावर बोट ठेवेल आणि तुम्ही कोणत्याही स्त्रीपेक्षा कमी आहात हे कोणालाही सांगू देऊ नका. माझ्याविषयी हे मला जाणवलं होतं, म्हणून मी समजू शकते की असे बरेच लोक आहेत.'
दरम्यान, सध्या मलायका ही अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून ते लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, कॉफी विथ करण या शोमध्ये अर्जुन कपूरनं हजेरी लावली तेव्हा त्यानं सांगितलं की त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही आणि तो सध्या त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.