मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्ससाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. वाढत्या वयानुसार मलायका अधिक फिट आणि फॅशन फ्रीक होत आहे. कधी-कधी मलायकाचे काही लूक्स सोशल मीडियावर ट्रोल झाल्यामुळे व्हायरल होतात. असंच काहीसं यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. यावेळी मलायकावर तिच्या लेटेस्ट ब्रालेस लूकमुळे बरीच टीका होत आहे.
मलायका मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली होती
खरंतर, नुकतीच मलायका अरोरा मॉर्निंग वॉकला गेली होती. यादरम्यान, अभिनेत्री ट्रॅक सूट परिधान करून कॅज्युअल लूकमध्ये दिसली. मात्र सर्वांच्या नजरा तिच्या ब्रालेस लुकवर थांबल्या. अशा स्थितीत एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, ' दोन-दोन मास्क घातले आहेत एक ब्रा सुद्धा घातली पाहिजे होती.' या ट्रोलिंगशिवाय सगळे चाहते मलाइकाला सपोर्ट करताना दिसत आहेत.
मलायकाचा लूक
मलायका अरोराच्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती मॉर्निंग वॉकला गेली असून तिच्या हातात डॉगी दोरी असल्याचं दिसून येतं. 48 वर्षीय बॉलिवूड स्टारने ग्रे कलरचा स्वेटशर्ट घातल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
मलायकाच्या चेहऱ्यावर दोन मास्क होते. याचबरोबर गुलाबी चप्पल तिने या लूकवर घातली होती. या सर्वांबद्दल सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे तिने तिच्या आरामदायक लूकसाठी ब्रालेस जाण्याचा पर्याय निवडला. ज्याने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचबरोबर काही सोशल मीडिया यूजर्सनी तिला या गोष्टीसाठी खूप वाईट देखील म्हटलं आहे.