मलायकाचे अपूर्ण कपडे आणि तिची पाय दुमडून बसण्याची स्टाईल, ज्यामुळे....

आता मलायका चर्चेत आली आहे, पण खासगी आयुष्यामुळे नाही तर तिच्या ड्रेसमुळे  

Updated: Mar 29, 2022, 03:15 PM IST
मलायकाचे अपूर्ण कपडे आणि तिची पाय दुमडून बसण्याची स्टाईल, ज्यामुळे....

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता मलायका चर्चेत आली आहे, पण तिच्या ड्रेसमुळे. मलायकाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. पण काहींना मात्र मलायकाची स्टाईल आणि ड्रेस आवडलेला नाही. 

सध्या सोशल मीडियावर मलायकाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. मोकळ्या केसांमध्ये मलायचा लूक तर सर्वांना आवडला. पण तिची पाय दुमडून बसण्याची स्टाईल मात्र अनेकांना खटकली. 

मलायका तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे तर कायम चर्चेत असते. पण अभिनेता अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे देखील ती चर्चेत असते. अर्जुन आणि मलायकाला त्यांच्या रिलेशनशिपमुळे कायम ट्रोल केलं जातं. 

पण दोघांना लोकांच्या टीकेचा काही फरक पडत नाही. दोघेही सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करत असतात.