किन्नर आखाडाच का निवडला? महामंडलेश्वर झाल्यानंतर ममता कुलकर्णीने केला खुलासा, म्हणाली 'मीदेखील...'

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने प्रयागराजच्या महाकुंभमध्ये संगममध्ये डुबकी घेतली आणि संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं. तिला किन्नर आखाड्याच्या महिला शाखेचं महामंडलेश्वरचं पद देण्यात आलं आहे. तसंच ममताचं नाव बदलून यमाई ममता नंद गिरी ठेवण्यात आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 25, 2025, 05:15 PM IST
किन्नर आखाडाच का निवडला? महामंडलेश्वर झाल्यानंतर ममता कुलकर्णीने केला खुलासा, म्हणाली 'मीदेखील...' title=

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी शुक्रवारी प्रयागराजच्या महाकुंभमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने संगममध्ये डुबकी घेतली आणि कौटुंबिक जीवनातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं. किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर कौशल्या नंद गिरी उर्फ टीना माँ यांनी सांगितलं आहे की, ममता कुलकर्णीने गंगेत डुबकी घेतली आणि गंगेच्या किनारी पिंडदान केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री जवळपास 8 वाजता किन्नर आखाड्यात वैदिक मंत्रोच्चार करत महामंडळेश्वर म्हणून तिचा पट्टाभिषेक करण्यात आला. 

टीना माँ यांनी सांगितले की, या कार्यक्रमात, जूना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी महेंद्रानंद गिरी, किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि इतर किन्नर महामंडलेश्वरांच्या उपस्थितीत, पाचही महामंडलेश्वरांपैकी पहिले - गिरनारी नंद गिरी, कृष्णानंद गिरी, राजेश्वरी नंद गिरी, विद्या नंद गिरी आणि नीलम नंद गिरी यांचा राज्याभिषेक झाला. कौशल्या नंद गिरी म्हणाल्या की, यानंतर अभिनेत्री ममता कुलकर्णी यांचा पट्टाभिषेक झाला आणि त्यांना यमाई ममता नंद गिरी हे नवीन नाव देण्यात आले.

पट्टाभिषेक झाल्यानंतर, लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी घोषणा केली की ममता कुलकर्णी यांचा किन्नर आखाड्याच्या महिला शाखेत महामंडलेश्वर म्हणून पट्टाभिषेक करण्यात आला आहे आणि त्यांना यमाई ममता नंद गिरी हे नवीन नाव देण्यात आले आहे. पट्टाभिषेक झाल्यानंतर ममता कुलकर्णीने सांगितलं की, तिने 23 वर्षांपूर्वी कुपोली आश्रमातील जुना आखाड्यातील चैतन्य गगन गिरी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली होती आणि त्या गेल्या दोन वर्षांपासून लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या संपर्कात आहे.

'मला बॉलिवूडमध्ये परत जायचं नाही'

ममता कुलकर्णी म्हणाली की, लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी माझी 23 वर्षांची तपश्चर्या समजून घेतली आणि स्वामी महेंद्रानंद गिरी महाराजांनी माझी परीक्षा घेतली ज्यामध्ये मी उत्तीर्ण झाले. गेल्या तीन दिवसांपासून माझी चाचणी होत आहे हे मला माहित नव्हतं. मला कालच महामंडलेश्वर बनवण्याचं निमंत्रण मिळालं. कुलकर्णी म्हणाले, 'किन्नर आखाडा मध्यम मार्ग असल्याने मी त्यात सामील झाले. मला बॉलिवूडमध्ये परत जायचे नव्हते, म्हणून मी 23 वर्षांपूर्वी बॉलिवूड सोडले. आता मी मध्यममार्गाचा अवलंब करून मुक्तपणे सनातन धर्माचा प्रचार करेन. मी 23 वर्षांपूर्वी महाकुंभमेळ्यासाठी इथे आलो होते".

'माझ्याकडे 25 चित्रपट होते'

ममता कुलकर्णीने सांगितलं की, स्वामी महेंद्रानंद गिरी, इंद्र भारती महाराज आणि आणखी एक महाराज ब्रह्मा विष्णू महेशच्या रूपात माझ्यासमोर प्रकट झाले. माझ्या मनाने म्हटले की जर तुम्ही 23 वर्षे तपश्चर्या केली असेल तर ते निश्चितच प्रमाणपत्र (महामंडलेश्वर पद) लायक आहे. आपल्या बॉलिवूड प्रवासाबद्दल बोलताना ती म्हणाली की, “मी 40-50चित्रपटांमध्ये काम केले आणि जेव्हा मी चित्रपटसृष्टी सोडली तेव्हा माझ्या हातात 25 चित्रपट होते. मी कोणत्याही संकटातून संन्यास घेतला नाही, तर आनंद अनुभवण्यासाठी संन्यास घेतला".