नेहरु जॅकेट आणि टोपीमध्ये दिसणारी अभिनेत्री बॉलिवूडची पहिली सुपरस्टार, घ्यायची सर्वात जास्त फी, ओळखलं?

नेहरु जॅकेट आणि टोपीमध्ये दिसणारी ही अभिनेत्री आहे बॉलिवूडची पहिली सुपरस्टार. चित्रपटासाठी आकारायची सर्वात जास्त मानधन. तुम्ही ओळखलं का? 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 25, 2025, 02:09 PM IST
नेहरु जॅकेट आणि टोपीमध्ये दिसणारी अभिनेत्री बॉलिवूडची पहिली सुपरस्टार, घ्यायची सर्वात जास्त फी, ओळखलं? title=

देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि मुलांचे आवडते चाचा नेहरू यांच्या लूकमध्ये दिसणारी ही मुलगी बॉलिवूडची पहिली सुपरस्टार आहे. फोटोमध्ये बेहरू जॅकेटमध्ये ही मुलगी खूपच क्यूट दिसत आहे. लहानपणी ही मुलगी मोठ्या कलाकारांसोबत दिसायची. तिने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं आहे. जगभरात या अभिनेत्रीचे लाखो चाहते होते. त्यांच्या नावाने चित्रपट प्रदर्शित होत होते. ते बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट देखील व्हायचे. मात्र, ही अभिनेत्री आता या जगात नसली तरी तिच्या कामातून ती आजही लाखो चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. त्यांची एक मुलगी टॉप अभिनेत्री बनली आहे तर दुसऱ्या मुलीनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

श्रीदेवी यांचा बालपणीचा फोटो

जर तुम्ही अजूनही या अभिनेत्रीला ओळखले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की हा लोकप्रिय अभिनेत्री दुसरी कोणी नसून ती  श्रीदेवी आहे. हा फोटो श्रीदेवी यांचा बालपणीचा फोटो आहे. श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला होता. त्यांनी तमिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. श्रीदेवी या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या सुपरस्टार असल्याचे म्हटले जाते. श्रीदेवी यांना अभिनयासाठी पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. 1980 आणि 1990 च्या दशकात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये श्रीदेवी यांचा समावेश होता. 2013 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

श्रीदेवी यांचा पहिला चित्रपट

 1985 मध्ये त्यांनी 'ज्युली' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. श्रीदेवी यांचा पहिला चित्रपट होता 'मूंदरू मुदिचू'. जो तमिळ भाषेत होता. 1985 मध्ये 'सोलवा सावन' या चित्रपटात त्यांनी डेब्यू केला होता. मात्र, 1983 मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला' चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्या एकामागून एक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसल्या. सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इन्डिया, चालबाज़, लम्हे, ख़ुदागवाह आणि जुदाई हे त्यांचे सर्वोत्कृष्ट चित्रपट आहेत.

मल्याळम आणि काही कन्नड चित्रपटांमध्ये देखील श्रीदेवी यांनी काम केले आहे. जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या त्यांच्या मुली आहेत. जान्हवी कपूर बॉलिवूडमधील मोठी अभिनेत्री आहे. तर खुशी कपूरने या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचे दुबईत निधन झाले.