Manasi Naik and Pradeep Kharera Divorce : मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते. मानसीचं ‘बघतोय रिक्षावाला’ (Baghtoy Rikshawala), ‘बाई वाड्यावर’ ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. खरंतर या गाण्यांमुळे मानसीला घराघरात ओळख मिळाली. काही दिवसांपूर्वी मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा (Pradeep Kharera) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिनेत्रीनं दुजोरा दिला होता. इतकंच काय तर त्यानं पैसा आणि प्रसिद्धी मिळावी म्हणून तिच्याशी लग्न केलं होतं. दरम्यान, आता मानसी नाईकनं पती प्रदीप खरेराच्या एका व्हिडीओवरून एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
प्रदीपनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत तो रडताना दिसत आहे. या व्हिडीओवरून मानसीशी घटस्फोट घेतल्यानंतर तो आता खूप शांत आणि दु: खी असल्याचे दाखवण्याचा त्यानं प्रयत्न केला आहे. हे पाहिल्यानंतर मानसीनं त्याच्याविरोधात एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : दीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच होणार...?
प्रदीपच्या त्या व्हिडीओवर मानसी म्हणाली की, 'अरे कच्ची कलियां मिल गई एक नहीं बल्की दो दो…और रोने के अॅक्टिंग के ५० रुपये काटे जाए… बंदा पार्टी करता है और रील में रोता है…#FakeLove, सहानुभूती, मै ही दे देती फुकट में, जैसे खाया यूज किया फुकट में #KarmaWillTalk.', असे मानसी पोस्टमध्ये म्हटली आहे.
मानसीसा पती प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर आणि मॉडेल (Mansi Naik Husband Profession)आहे. बरीच वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी सप्तपदी घेण्याचा निर्णय घेतला होता. नेहमीच पतीसोबत फोटो शेअर करणारी मानसी गेल्या काही दिवसांपासून प्रदीपसोबतचे फोटो शेअर करत नसल्याचे काही नेटकऱ्यांच्या लक्षात आले आहे. फक्त मानसी नाही तर तिचा पती प्रदीप देखील नेहमीच मानसीसोबत फोटो शेअर करायचा. (Mansi Naik Husband Is Boxer and Model)आता त्याच्या अकाऊंटवरही मानसीचे फोटो दिसत नाही असे म्हणत काही नेटकऱ्यांनी ती विभक्त झाले का किंवा त्यांच्यात दुरावा आला का असा प्रश्न केला आहे. दरम्यान, त्या दोघांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. मानसी आणि प्रदीप 19 जानेवारी 2021 रोजी लग्नबंधनात अडकले होते.