Marathi Actress On Women Empowerment : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठे या सध्या तिच्या 'मॅच फिक्सिंग' ला घेऊन चर्चेत आहे. या निमित्तानं अनुजानं नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत अनुजानं अनेक गोष्टींवर चर्चा केली. अनुजानं हे देखील म्हटलं की मुलींसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे त्यांनी स्वत: चे निर्णय स्वत: घ्यावे.
अनुजानं ही मुलाखत 'नवभारत टाईम्स'ला दिली आहे. या मुलाखतीत नेहमीच स्वावलंबी अभिनेत्रींच्या भूमिका साकारण्यावरून प्रश्न विचारण्यात आला की अशा भूमिका साकारल्या असल्या तरी तुझ्यासाठी महिला सशक्तीकरण काय आहे? महिलांच्या सशक्तीकरणात जर काही अडथळा असेल तर तो कोणता तर तुला काय वाटतं? 'माझ्यासाठी सशक्तीकरण हे आहे की तुम्ही कोणावर अवलंबून राहणार नाही. तुम्ही स्वत: तुमचे पैसे कमावतात. कोणी तुमच्या खर्चासाठी पैसे देत नाही. ही भावनाच वेगळी असते. पण जर तुम्ही कमवत नसाल आणि इतकं असलं तरी तुम्ही स्वत: चे निर्णय स्वत: घेत आहात. सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवता की तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे. तर माझ्या नजरेत तुम्ही आत्मनिर्भर आहात. माझ्यासाठी हे देखील सशक्तीकरण आहे. माझं मत हे आहे की समाज बदलतय, पण अजूनही खूप बदल होणं बाकी आहे. छोटं शहर, गावात आजही असा विचार केला जातो की महिलांनी लग्न करावे आणि मुलं वाढवावीत. त्यानंतर त्यांची काळजी घ्यावी, बाकी तर सगळे तुम्हाला भेटतच आहेत. पण हे विचार बदलायला हवे. महिलांनी घरातून बाहेर पडणं, आपलं स्वत: चं स्थान शोधणं महत्त्वाचं आहे. '
हेही वाचा : संभाजी महाराजांना नाचताना दाखवल्याने संताप! Chhaava चा Trailer पाहून चाहते म्हणाले, 'उतेकर मराठी असूनही...'
अनुजाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर मराठी थिएटर आणि चित्रपटांमध्ये तिनं खूप काम केलं आहे. तिच्या अभिनयाच्या जोरावर अनुजानं हिंदीत स्वत: चं स्थान निर्माण केलं. 'तमन्ना' आणि 'पेशवा बाजीराव' सारख्या मालिकांमध्ये आणि 'महारानी' आणि 'एक थी बेगम' या सीरिजमध्ये अनुजानं काम केलं आहे. या प्रोजेक्ट्समधील तिच्या भूमिकांनी सगळ्यांची मने जिंकली आहेत.