Ranji Trophy: रोहित, रहाणे आणि शिवम दुबेची विकेट काढणारा 6.4 फूट उंचीची उमर नजीर आहे तरी कोण?

Who is Umar Nazir Mir: रणजी ट्रॉफीत मुंबईविरोधातील सामन्यात जम्मू काश्मीरचा जलदगती गोलंदाज उमर नजीर (Umar Nazir) याने रोहित शर्मा (Rohit Sharma), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांची विकेट घेत जबरदस्त खेळी केली.   

शिवराज यादव | Updated: Jan 23, 2025, 03:12 PM IST
Ranji Trophy: रोहित, रहाणे आणि शिवम दुबेची विकेट काढणारा 6.4 फूट उंचीची उमर नजीर आहे तरी कोण? title=

Who is Umar Nazir Mir: रणजी ट्रॉफीत मुंबईविरोधातील सामन्यात जम्मू काश्मीरचा जलदगती गोलंदाज उमर नजीरने (Umar Nazir) सर्वांना आपल्या कामगिरीने आश्चर्यचकित केलं आहे. उमर नजीरने रोहित शर्मा (Rohit Sharma), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांची विकेट सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. 31 वर्षीय गोलंदाजाने आपला वेग आणि बाऊन्सने मुंबईच्या फलंदाजांसमोर आव्हान उभं केलं. यामुळे मुंबईचा संघ थोड्या अंतराने सतत विकेट गमावत होत्या. 

उमर नजीरने (Umar Nazir) शॉर्ट पीच डिलिव्हरी टाकत रोहित शर्माला फक्त 3 धावांवर तंबूत धाडलं. तसंच अजिंक्य रहाणेला 12 धावांवर असताना क्लीन बोल्ड केलं. शिवम दुबे तर खातंही उघडू शकला नाही आणि झेलबाद झाला. स्थानिक क्रिकेटमध्ये जम्मू काश्मीरसाठी मिर महत्त्वाचा खेळाडू असून, त्याने आपल्या खेळीने अनुभवाची झलक दाखवली. 

मिरने 2013 मध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्याने 57 सामन्यांमध्ये 138 विकेट्स घेतल्या आहेत. अ श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 54 तर टी-20 मध्ये 32 विकेट्स घेतल्या आहेत. मिर हा मूळचा पुलवामाचा असून, त्याची उंची 6 फूट 4 इंच आहे. याशिवाय 2018-19 च्या देवधर ट्रॉफीसाठी भारत क संघात त्याची निवडही झाली होती. 

गुरुवारी जम्मू आणि काश्मीर विरुद्ध मुंबईच्या रणजी ट्रॉफी सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याचा सलामीचा जोडीदार यशस्वी जयस्वाल यांच्यासाठी स्थानिक क्रिकेटमध्ये बहुप्रतिक्षित पुनरागमन खूप निराशाजनक ठरले. रोहित आणि जयस्वाल यांनी गतविजेत्या मुंबईसाठी पहिल्यांदाच खेळी केली. परंतु अनुक्रमे 3 आणि 4 धावांवर बाद झालेल्या स्टार क्रिकेटपटूंसाठी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगलं पुनरागन करण्याचं स्वप्न भंगलं.