Ketaki Chitale Post on Mumbai Bomb Blast : सध्या देशभरात निवडणुकीचं वारं वाहत आहे. सर्व नेते प्रचारात व्यस्थ असताना अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच वायव्य मुंबई मतदारसंघात वाद सुरू झालाय तो इक्बाल मुसा (Iqbal Musa) याच्या उपस्थितीमुळे... ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांच्या प्रचारयात्रेत मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा सहभागी झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यानंतर अनेक राज्याच्या राजकारणात चर्तेला उधाण आलं होतं. अशातच आता याच प्रकरणावरून अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) वादग्रस्त पोस्ट केली आहे. केतकीने थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची लाज काढल्याचं पहायला मिळतंय.
काय म्हणाली केतकी चितळे?
ठाकरे लाज कशी वाटत नाही तुम्हाला? लकी पेट्रोल पंप उडाला (जो आम्हाला त्यावेळी ट्रकचे टायर फुटले असावे वाटले आवाज ऐकून) त्यातील आरोपीला स्टार प्रचारक म्हणून मिरवताय? कीर्तीकरांना तसेच मी मत देणार नव्हतेच पण आज बाळासाहेबांमुळे जो काही 0.0001 टक्के आदर मनात होता तुमच्याविषयी, तोही तुम्ही मातीत मिळवण्यात यशस्वी झालात. राग, चीड, द्वेष, संताप अशा भावना देखील मनात येत नाहीयेत, येते आहे ती फक्त कीव, अशी पोस्ट केतकी चितळे हिने केली आहे.
केतकी चितळेने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. त्यावर लिहिताने तिने उद्धव ठाकरेंना धारेधर धरलं. केतकीच्या या वादग्रस्त पोस्टमुळे आता राज्याच्या राजकारणात नवं वादळ येणार की काय? असा सवाल विचारला जाऊ लागलाय. नेहमी वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असणाऱ्या केतकीने आता थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा लगावला आहे.
दरम्यान, मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू असताना केतकीने वादग्रस्त पोस्ट केली होती. एके ठिकाणी (बरीच वर्षे शिव्या घातल्यावर) ब्राह्मण तुष्टीकरण करताना स्वतःच्या कानांनी ऐकले आणि डोळ्यांनी बघितलय, असं केतकीने म्हटलं होतं. त्यावरून देखील मोठा वाद निर्माण झाला होता.