मुंबई : बॉलिवूडच्या बी ग्रेड सिनेमात काम करणारी लैला खान म्हणजेच रेशमा नादिरशाह पटेल (Laila Khan alias Reshma Nadirshah Patel) ला मोठ्या प्रतिक्षेनंतर न्याय मिळाला आहे. लैलाच्या आईच्या तिसऱ्या पतीने म्हणजेच लैलाच्या सावत्र वडिलांनी तिची हत्या केली. यावेळी अभिनेत्री अवघ्या ३० वर्षांची होती. वडिल परवेझ इक्बाल टाक यांनीच आपल्या सावत्र लेकीला संपवल्याच्या वृत्ताने सगळीकडे चांगलीच खळबळ माजली होती. २०११ साली लैला आणि तिच्या आईसह ६ जणांची तिच्या सावत्र वडिलांनी हत्या केली होती. या सहा जणांचे मृतदेह त्याने इगतपुरी येथील लैलाच्या फार्म हाऊसमध्ये पुरले. या खुनाप्रकरणी न्यायालयाने आरोपी परवेझ इक्बाल टाक याला दोषी ठरवलं आहे.
लैला खानच्या सिने करिअरची सुरुवात कन्नड सिनेमा 'मेकअप'ने झाली मात्र तिला खरी ओळख मिळाली राजेश खन्नासोबत काम केलेल्या 'वफा : ए डेडली लव स्टोरी' या सिनेमातून. हा सिनेमा २००८ साली आला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फारसा चालला नाही. या सिनेमाची चर्चा या सिनेमातील बोल्ड सीनमुळे झाली होती. राजेश खन्ना आणि लैला खानमध्ये बरेच बोल्ड सीन या सिनेमात होते. हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर लैला सी ग्रेड सिनेमात काम करु लागली.
लैला खान आणि तिची आई शेहलिना खानसोबत तिचा परिवारातले पाच सदस्यांचे बेपत्ता असल्याचे रिपोर्ट लैलाचे वडिल आणि तिची आईचे पहिल्या पतीने नादिरशाह पटेलने केस दाखल केली होती. शेहलिना खान ५९ तिची मोठी मुलगी अजमीना पटेल ३२, दुसरी मुलगी लैला ३०, जुळी मुलं जारा आणि इमरान २५ आणि तिची नातेवाईक रेशमा सगीर खान उर्फ टल्ली (19) ची हत्या करुन आरोपीने फार्म हाऊसमध्ये गाडलं होतं. डीएनए रिपोर्टनंतर सांगाडा ओळखता येईल. टाकने पोलिसांना सांगितलं होतं की, त्याला पत्नीची तिचा एक्स पती आसिफ शेखशी असलेली जवळीक आवडत नव्हती. मात्र, मालमत्तेचा वाद हे खुनाचे कारण असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारली नाही.
या प्रकरणाच्या घटनांचं वर्णन करत बोलताना टाक म्हणाला,''८ फेब्रुवारी रोजी सर्वांनी बार्बेक्यू केलं होतं. सकाळी 1 वाजता फार्महाऊसच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या रुममध्ये डान्स करण्यासाठी गेलो. त्यानंतर शहलीना आणि त्याच्यामध्ये जोरदार भांडणं झालं या भांडणानंतर सगळे खाली आले. आणि यानंतर शहलिनाच्या डोक्यावर धारदार वस्तूने वार करण्यात आला. यामुळे ती गंभीर रित्या जखमी झाली आणि याचदरम्यान तिचा मृत्यू झाला. तिचा आरडा -ओरडा ऐकून बाकिचे सगळे लोकं खाली आले. त्यांनाही मारहाण झाल्यानंतर मी शाकिर हूसैनला आवाज दिला. शाकिर हा माझ्या कश्मिरच्या फार्महाऊसमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. मग आम्ही सगळ्यांचीच हत्या केली.''