Actress Aishwarya Narkar Trolled: मराठी चित्रपटसृष्टीत ऐश्वर्या नारकर (Actress Aishwarya Narkar) हे खूपच लोकप्रिय आहे. मालिका, चित्रपट आणि नाटकांतून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपलं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी अनेक सुपरहीट मराठी मालिकांमधूनही कामं केली आहेत. त्यांनी कलर्स मराठीवरील स्वामिनी या मालिकेतून साकारलेली गोपिकाबाईंची भुमिका विशेष गाजली आहे. सध्या त्या झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी (Satvya Mulichi Satvi Mulgi) या मालिकेतून नकारात्मक भुमिकेतून प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचेही विशेष कौतुक करण्यात आले आहेत. ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर फार जास्त एक्टिव्ह आहेत. त्यांनी नुकताच आपला एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे त्या ट्रोलर्सच्या (Trolling) निशाण्यावर आल्या आहेत. (marathi popular actress aishwarya narkar slams at trollers after getting trolled on wearing shorts)
काही दिवसांपुर्वी त्यांनी हा फोटो शेअर केला होता ज्यात त्या शॉर्टमध्ये दिसत आहेत. त्या फोटोखाली नेटकऱ्यांनी कमेंट करत ऐश्वर्या नारकर यांना ट्रोल केले आहे. काहींनी त्यांना असं म्हटलं आहे की, तुम्ही असे छोटे कपडे कसे काय घालता? म्हातारवयात हे धंदे कसे सुचतात? अशा काही कमेंट्स व्हायरल झाल्या. तेव्हा एका मुलाखतीत (Aishwarya Narkar Interview) त्यांनी यावर पोस्टवरून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहेत. त्यांना त्यांच्या वयावरून ट्रोल करण्यात आल्यामुळे त्यांनी या प्रकरणावरून ट्रोलरची शाळा घेतली आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत त्यांना या प्रकरणावरून प्रश्न विचारण्यात त्यावर त्यांनी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. “मी आतापर्यंत कधीही शॉर्ट्स घातली नव्हती. कॉलेजमध्ये असताना मी कधी जीन्स देखील घातली नव्हती. आता कुठे मी स्लिव्हलेस ब्लाऊज घालायला लागले आहे. मला ज्या कपड्यात योग्य वाटतं, ते कपडे मी घालते. त्यादिवशी मी शॉर्ट्स घातली, तेव्हा मला फार कम्फर्टेबल वाटत होतं.
मी गेल्या 18 ते 20 वर्षांपासून योगा करते. आता कुठे मी माझी लाइफस्टाइल लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. मला असं वाटतं की ज्याला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटतं, त्याने ते कपडे घालायला काहीच हरकत नाही. त्यामुळे अशा कमेंट्स करुन उगाचच आपली शक्ती वाया घालवू नका. जर तुम्हाला आवडत नसेल तर अनफॉलो करण्याचा ऑप्शन तुमच्याकडे असतो किंवा आम्हाला हे आवडलं नाही, असंही तुम्ही चांगल्या भाषेत सांगू शकता. त्यामुळेच उगाचच दुसऱ्याला ट्रोल करण्यात वेळ वाया घालवू नका.
आपल्याला त्यात काय चांगलं घेता येईल ते पाहावं. ज्या वेळेला आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा उरलेली चार बोटं ही आपल्याकडे असतात. आपण किती फिट आहोत हे बघणं महत्वाचं आहे. मला हे करण्यात फिजिकली छान वाटतंय, त्यामुळे मी काही वेगळं करतेय असं मला वाटत नाही मला ती शॉर्टस वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून मिळाले होते. मी ते फोटो पोस्ट करणारही नव्हते, पण मला ते चांगले आणि योग्य वाटले, म्हणून मी ते पोस्ट केले होते. आता आयुष्यातली 50 वर्षे गेलीत, उरलेली किती हातात आहेत ते माहीत नाही. पण जे आहे त्यात आनंदी राहावं अशी माझी इच्छा आहे”, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
ऐश्वर्या नारकर (Beautiful Aishwarya Narkar) या सौंदर्याच्या बाबतीत अजिबातच कमी नाहीत. त्यामुळे त्या त्यांचे सुंदर फोटोज आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. परंतु नुकत्याच एका फोटोवरून त्यांना ट्रोल करण्यात आले. तुमच्या वयाला असे शॉर्ट घालणं शोभत का? असं म्हणतं त्यांच्यावर अनेकांनी नकारात्मक कमेंट्स केल्या. ऐश्वर्या नारकर यांचे सोज्वळ रूप सगळ्यांनाच भावते.
त्या साडीमध्ये, चुडीदार ड्रेस नाहीतर अगदी वेस्टर्न आऊटफिट्समध्येही खूप सुरेख दिसतात. त्यांचे चाहते नेहमीच त्यांच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करतात.