मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेची सुरुवात मिनल हॉटेलमधून झाली. शनाया गुरूच्या फायनांशियल फ्रोब्लेम्सला वैतागून गुरूशी ब्रेकअप करू का असे मावशीला विचारात असते परंतु अशी चुकी करू नकोस असे मावशी तिला सांगते. दरम्यान मावशी तीन चार महिने थांब असे शनायाला सांगते. तेवढ्यात शनायाला गुरूचा फोन येतो आणि ती हॉटेलमधून निघून जाते. दुसरीकडे ए एल एक कंपनीचे शेअर्स घेण्यासाठी साठे बाईंचा सल्ला घेऊन, निरनिराळ्या तर्क वितर्कांची शहानिशा करून राधिका ए एल एफ कंपनीचे शेअर्स विकत घेण्याचा विचार करू लागते.
साठेबाईंकडून घरी आल्यावर राधिका ए एल एफ कंपनीचे शेअर्स विकत घेत असल्याचे आपल्या सासऱ्यांना सांगते आणि सासरे जाम खुश होऊन म्हणतात गुरू सारखी नालायक माणसं कंपनीत असतील तर असेच होणार. तेवढ्यात सरीता तेथे येते, तिला बघताच राधिका तिला नमस्कार करण्यासाठी खाली वाकते पण सरीता तिच्याकडे मुद्दामच दुर्लक्ष करते. आईने आशीर्वाद दिला नाही म्हणून खचून न जाता राधिका बाबांना येते बोलून आपल्या कामाला निघून जाते. राधिका घराबाहेर पडताच श्री सुभेदार सरीताला विचारतात की, राधिकाला आशीर्वाद का नाही दिलास? यावर सरीता म्हणते, कशाला देऊ आशीर्वाद? आता कोणता पराक्रम केला तिने. हे ऐकुन मात्र सुभेदारांना आपल्या बायकोचे काय बिनसलंय हेच कळत नाही.
तेवढ्यात स्वतःला आवरून श्री सुभेदार राधिका कुठे गेली आहे हे न सांगताच विषय बदलतात. दुसरीकडे राधिका समिधाच्या घरी जाऊन तिची चौकशी करते आणि ए एल एफ बद्दलची गोष्ट समिधाला सांगून टाकते. ते ऐकून समिधा फार खुश होते. तिकडे श्री सुभेदार आणि सरीता एकत्र बसून वार्तालाप करत असतात, एवढ्यात अथर्वच्या आठवणी वरून गुरूचा विषय निघतो आणि सरीता लगेच श्री सुभेदारांना म्हणते तुम्ही दोघं मिळून माझ्या पोराचे हाल हाल करून टाकणार आहात व गुरुपुराण लावते. तेव्हा श्री सुभेदारांना सरीताच्या बोलण्यातून ती गुरूच्या घरी गेल्याचे कळते आणि श्री सुभेदार अचंभित होतात. तू गुरूच्या घरी का गेलीस हे सरीताला श्री सुभेदार विचारणार एवढ्यात रेवती आणि तिचा नवरा तेथे येतो आणि श्री सुभेदारांचे बोलणे अर्धवट राहते.