Megha Ghadge On Gautami Patil: सोशल मीडिया स्टार (Social Media Star) आणि लावणी कलाकार गौतमी पाटील मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. तिच्या घायाळ अदाकारीमुळे तिचे व्हिडीओ तुफान व्हायरल (Gautami Patil Viral Video) होत असतात. तिचे लावणी शो देखील चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी एका लावणी शोमध्ये तुफान गर्दी पहायला मिळाली. तिची एक झलक पाहण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर मोठा वाद पेटला होता.
गौतमी पाटील लावणी सादर करताना अंगावर पाणी ओतून घेतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेकांनी तिच्या लावणीवर टीका करत हा अश्लिल प्रकार असल्याचं म्हटलंय. त्यावर आता लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे (Megha Ghadge) यांनी देखील आक्षेप घेतला.
आणखी वाचा - Gautami Patil : लावणी पाहताना प्रेक्षकाचा मृत्यू; गौतमी पाटील म्हणाली, "ते वयस्कर..."
खूप खूप धन्यवाद गौतमी पाटील. आज तुला लावणी क्विन हा किताब मिळाला. माफ कर खूप चूक झाली. खरंतर अशी लावणी असते हे आमच्या पूर्वज्यांना ही माहित न्हवतं, अशी खोचक टीका मेघा घाडगे यांनी केली. पुस्तकातून चुकीचा लोककलेचा अभ्यास शिकवला. कृपाकारून बंद करा हे सगळं. विनाकारण लोककलवांतांनी पिढ्यान पिढ्या कलेच्या नावाखाली पुरस्कार घेत गेले, आत्ता माझे डोळे उघडले, अशी खोचक टीका देखील त्यांनी केली आहे.
दरम्यान, मीही या पुढे साडीचा पदर अंगावर घेणार नाही. पायाखालून कमरेपर्यंत येईल तेवढी साडी, परकर वर करेन आणि पाण्याची बाटली घेऊन अंगावर ओली चिंब होईपर्यंत ओतेन, असंही त्या म्हणाल्या. खूप वाईट वाटलं ऐकून. पण तुझी ती भन्नाट अश्लील अदाकरी बघायला कोणाला नाही आवडणार? मला तुझी शिष्य बनवशिल का??, अशी पोस्ट मेघा घागडे यांनी लिहिली आहे.