चुकीची लॉटरी काढलेल्या महिलेचं नशीब पालटलं; जिंकला तब्बल 170000000 जॅकपॉट

Woman asked for scratch off ticket : कॅरोलटन येथील केली लिंडसेने स्थानिक दुकानातून खास स्क्रॅच-ऑफ तिकीट म्हणजे एक लॉटरी काढली. परंतु कॅशियरने चुकून त्या महिलेला मनी ब्लिट्झचे स्क्रॅच-ऑफ तिकीट दिले. आणि पुढे जे घडलं ते अतिशय धक्कादायक. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 22, 2025, 05:23 PM IST
चुकीची लॉटरी काढलेल्या महिलेचं नशीब पालटलं; जिंकला तब्बल 170000000 जॅकपॉट

कधी, कसे आणि कोणाचे नशीब बदलेल हे कोणालाही माहिती नाही. कधीकधी खूप प्रयत्न करूनही जिंकता येत नाही, तर कधीकधी एकाच चुकीमुळे जॅकपॉट लागतो. असंच काहीसं व्हर्जिनियातील एका महिलेसोबत काहीसे घडले आहे. ज्यामुळे त्या महिलेचे अक्षरशः नशीब बदललं आहे. व्हर्जिनियातील एका महिलेला चुकीचे लॉटरीचे तिकीट मिळाल्याने ती नाराज झाली होती, पण त्याच चुकीच्या लॉटरीच्या तिकिटामुळे तिला 20 लाख डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 17 कोटी 32 लाख रुपयांचा अक्षरशः जॅकपॉट मिळाला.

फॉक्स बिझनेसच्या वृत्तानुसार, कॅरोलटन येथील रहिवासी केली लिंडसेने स्थानिक दुकानातून खास स्क्रॅच-ऑफ तिकीट मागितले होते, परंतु कॅशियरने चुकून महिलेला मनी ब्लिट्झचे स्क्रॅच-ऑफ तिकीट दिले. पण कॅशियरच्या एका चुकीमुळे या महिलेचं अक्षरशः नशीब पालटलं आहे. 

चुकीच्या तिकिटामुळे मन नाराज?

चुकीची लॉटरी तिकीट मिळाल्याने केली लिंडसे सुरुवातीला नाराज झाली. नंतर त्याने पार्किंग क्षेत्रात तिकीट स्क्रॅच करण्याचा निर्णय घेतला. तिकीट स्क्रॅच केल्यानंतर जे घडले ते ऐकून केलीला धक्का बसला. केलीने $2 दशलक्षचा जॅकपॉट बक्षीस जिंकला होता, जो भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 17,32,83,100 रुपये आहे.

केलीचा राग क्षणार्धात नाहीसा 

लॉटरीचे तिकीट काढल्यानंतर केली लिंडसेचा राग क्षणार्धात नाहीसा झाला. या घटनेबद्दल केलीने गमतीने म्हटले की, मी यावर खूश नव्हते. ही लॉटरी तिकिटातील चूक केली लिंडसेच्या आयुष्यातील सर्वात भाग्यवान चूक ठरली.

लॉटरी जिंकल्यानंतर, केलीने वार्षिक पैसे घेण्याऐवजी तिचे जिंकलेले पैसे एकाच वेळी घेण्याचा निर्णय घेतला आणि सर्व कर भरल्यानंतर, केलीला $1,250,000 मिळाले. द मेट्रोच्या मते, मनी ब्लिट्झ गेममध्ये जॅकपॉट जिंकण्याची शक्यता 1142400 पैकी एक आहे. या गेममध्ये एकूण दोन टॉप बक्षिसे आहेत, म्हणजेच या गेमचा दुसरा भाग्यवान विजेता अद्याप जाहीर झालेला नाही.