MM Keeravani on Guneet Monga Oscar Winning Speech : यंदाचं ऑस्कर '(Oscar 2023) हे भारतीयांसाठी खरंच खास ठरलं. तीन कॅटेगरीत नॉमिनेशन मिळाल्यानंतर दोन कॅटेगरित पुरस्कार मिळाला. त्यात सगळ्यांचे लक्ष वेधणारी शॉर्ट डॉक्युमेंट्री 'द एलिफेंट व्हिस्पर्स' नं (The Elephant Whisperers). या शॉर्ट फिल्मला ऑस्कर पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. या डॉक्युमेंट्रीची निर्माती गुनीत मोंगाला (Guneet Monga) स्पीच देण्याची संधी मिळाली नव्हती, कारण मध्येच त्यांचा माइक बंद करण्यात आला होता. दरम्यान, आपल्याला ओरिजिनल सॉन्ग या कॅटेगरीत 'नाटू नाटू' (Natu Natu) गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला. या गाण्याचे कंपोजर एमएम कीरवानी (MM Keeravani) यांनी नुकताच खुलासा केला की गुनीत मोंगा यांची स्टेजवर तब्येत खराब झाली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
'नाटू नाटू' या गाण्याचे म्यूजिक कंपोजर एम एम कीरवानी यांनी नुकतीच गलत्ता प्लसला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत एम एम कीरवानी यांना ऑस्कर 2023 मध्ये गुनीत मोंगा यांच्या विनिंग स्पीचला कट करण्यावर प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर उत्तर देत एम एम कीरवानी म्हणाले, ऑस्कर जिंकल्यानंतर गुनीत मोंगा यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ऑस्कर मिळाल्यानंतर त्यांना बोलायला वेळ देण्यात आला नाही, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता आणि अचानक त्यांची तब्येत बिघडली. (Guneet Monga Oscar Winning Speech) दरम्यान, एम एम कीरवानी यांनी फक्त नाटू नाटू गाण्याचं म्युजिक कंपोज केलं नाही तर आर आर आर या संपूर्ण चित्रपटाचं म्युजिक त्यांनी कंपोज केलं आहे.
दरम्यान, गुनीत मोंगा यांनी त्यांचा माइक बंद करण्यावर आश्चर्य झाल्याचे म्हणत 'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की मला माझं ऑस्करचं स्पीच देण्याची संधी मिळाली नाही. मला एवढंच सांगायचं होतं की निर्मितीतला हा भारताचा पहिला ऑस्कर आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यावेळी माझं हृदय धडधड करू लागलं होतं. कारण मी इतक्या लांब येऊ शकत नव्हते आणि माझं ऐकलही नाही. मी तिथए परत जाईन आणि माझं ऐकतील याची मी खात्री करून घेईन.