Mohan Kapur Accused of Sexual Harassment : बॉलिवूड अभिनेता मोहन कपूर (Mohan Kapur) हे नाव कोणासाठी नवीन नाही. सध्या मोहन कपूर हे त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. मोहन कपूर यांच्यावर एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित महिला ही मोहन कपूर यांची मोठी चाहती होती. गेल्या अनेक वर्षांपासून मोहन तिचा छळ करत असल्याचा आरोप त्या अल्पवयीन मुलीने केला आणि त्यांच्या या कृत्याविषयी त्यांच्या पार्टनरला देखील माहित होते. या पीडित महिलेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लैंगिक शोषणाशी संबंधित सर्व माहिती दिली आहे. (Sexual Harrasment Case)
हेही वाचा : लग्नाची सजावटही निघाली नव्हती; तोच 37 वर्षीय गायकानं झोपेतच घेतला अखेरचा श्वास
या पीडित महिलेनं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये मोहन कपूर यांच्यासोबत तिची पहिली भेट कशी झाली आणि 2020 नंतर त्यानं तिच्याशी बोलणं का बंद केलं हे देखील सांगितलं आहे. पीडितेनं या ट्वीटमध्ये तिच्या तरुण वयाचा फायदा घेण्याचा कसा प्रयत्न झाला, ज्यामुळे तिला नेहमीच भीती आणि डिप्रेशनमध्ये जाण्यास भाग पाडले जाते. तरुणीनं एकामागून एक असे अनेक ट्वीट केले. यासोबतच मोहन कपूर यांच्या गर्लफ्रेंडलाही सगळं काही माहित होतं. पीडित महिलेनं हे संपूर्ण प्रकरण मोहन यांच्या गर्लफ्रेंडला सांगितलं मात्र तिला कोणीही मदत केली नाही.
पीडित महिलेनं लिहिलं की जेव्हा हे सर्व तिच्यासोबत सुरू झाले तेव्हा ती फक्त 14 वर्षांची मुलगी होती. मी मोहन कपूरच्या गर्लफ्रेंडची फॅन होते. छोट्या पडद्यावरील त्यांच्या गर्लफ्रेंडचं मोठ नाव आहे, त्यामुळे माझी त्यांच्याशी ओळख झाली आणि मग मैत्री झाली आणि मोहन कपूरही माझे मित्र झाले. हे दोघे माझ्यासाठी दुसऱ्या पालकांसारखे होते. त्यानंतर मी त्यांच्या अभिनेत्री गर्लफ्रेंडला माझ्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. पण सगळं ऐकून तिनं न ऐकल्यासारखं केलं. यानंतर मोहननं माझं आयुष्य नरकापेक्षाही वाईट केले.
मोहन कपूर यांनी त्यांच्या अकाऊंटची सेटिंग बदलून ते रेस्ट्रिक्टेड केले आहे. अभिनेत्री तनुश्रीने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर भारतात #MeToo चळवळ सुरू झाली. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींवर #MeToo चे आरोप समोर आले. (Mohan Kapur accused of sexual harassment Sent Dck Pics To A 15-Year-Old Girl Share Metoo story on twitter)