मुंबई : छोट्या पडद्यावरील नागिन म्हणजे मौनी रॉय लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत 'ब्रम्हास्त्र' च्या शुटिंगमध्ये बुल्गारिया येथे आहे. नागिन या मालिके व्यतिरिक्त मौनीने 'देवों के देव महादेव' सारख्या मालिकेत देखील काम केलं आहे. यावेळीच मौनीच्या अफेअरची चर्चा अभिनेता मोहित रैनसोबत होती.
दोघं अनेकदा एकत्र दिसले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांच आलबेल नसल्याच दिसत आहे. एवढंच काय दोघांनी एकमेकांना इंस्टाग्राम आणि ट्विटरवरून फॉलो केलं. एवढंच काय तर त्यांनी एकमेकांचे शेअर केलेले फोटो देखील डिलिट केले.
मौनीने कधीही आपल्या रिलेशनशिपबद्दल स्पष्टपणे सांगितलं नाही. मौनीने ब्रेकअपबाबत मोठा खुलासा केला आहे. एका दिलेल्या मुलाखतीत मौनीने सांगितलं की, मी एकटी आहे आणि मी गेली कित्येक दिवस एकटीच आहे. मोहित आणि मी आता मित्र देखील राहिलेलो नाही.