मुंबई : दररोज अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. प्रत्येक चित्रपटाचं एक वेगळे पण असतं. आजकाल, प्रेक्षकांना चित्रपटांमध्ये रक्त, हिंसा पाहण्याची सवय झाली असेल, पण काही चित्रपट मर्यादा ओलांडतात. क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या 'कॅनिबल होलोकॉस्ट' या चित्रपटांपैकी एक चित्रपट होता. या चित्रपटात इतकं वाईट दाखवण्यात आले की काही काळानंतर या चित्रपटावर बंदी आणली होती. या चित्रपटात इतकी क्रूरता दाखवण्यात आली होती की ते पाहणे अशक्य होतं. त्यामुळे प्रदर्शित होण्यापूर्वीच न्यायालयानं या चित्रपटावर बंदी घातली होती. जी आजही अनेक देशांमध्ये लागू आहे.
हेही वाचा : घटस्फोटांच्या चर्चांमध्ये सानिया मिर्झा आणि शोएबचा 'तो' फोटो व्हायरल
1980 मध्ये प्रदर्शित झाला 'कॅनिबल होलोकॉस्ट' हा इटालियन चित्रपट होता. या चित्रपटातील हिंसाचाराची दृश्ये खरी वाटावीत म्हणून दिग्दर्शकाने कलाकारांना कॅमेऱ्यासमोर प्राण्यांना मारायला लावले. इतकंच नाही तर निर्मात्यांनी रेप सीनही प्रत्यक्षात करण्यात आले होते. हा त्या काळातील सर्वात वादग्रस्त चित्रपट देखील होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन रुग्गेरो डिओडाटो यांनी केले होते आणि यात रॉबर्ट कर्मन, गॅब्रिएल यॉर्के, लुका जॉर्जियो बार्बरेची, फ्रान्सिस्का सिआर्डी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
Cannibal Holocaust (1980)
Are you a fan of this disturbing Cannibal film? Thoughts? pic.twitter.com/HiLIhFMF1d— Sage O'Hare (@BigShade55) November 6, 2022
या चित्रपटाची कथा ही जंगलात राहणाऱ्या आदिवासींच्या अवतीभोवती फिरते. दिग्दर्शकाला हा चित्रपट जिवंत करायचा होता, पण त्या काळात व्हीएफएक्स नव्हते, त्यामुळे जेव्हा त्याचे दिग्दर्शन सुरु झाले तेव्हा हे सगळं करण्यात आलं होतं. अशा स्थितीत दिग्दर्शकानं ठरवलं की चित्रपटात खरा रेप सीन करायचा. रुग्गेरो डिओडाटो यांची एवढी मनमानी होती की, त्याचा फटका कलाकारांना सहन करावा लागला होता.
चित्रपटाची थीम आदिवासींवर आधारित असल्याने बहुतेक कलाकारांनी चित्रपटात कपड्यांशिवाय तर कधी नग्न सीन दिले होते. चित्रपटात बलात्कार खरा वाटावा, म्हणून त्याचे चित्रीकरणही वास्तवात झाले. एका सीनदरम्यान जेव्हा अभिनेत्री फ्रान्सिस्का सिआर्डीने तिचे कपडे काढण्यास नकार दिला तेव्हा दिग्दर्शकाने तिला खूप सुनावले, तिला बाहेर काढले. त्यानंतर घाबरलेल्या फ्रान्सिस्कानं कपड्यांशिवाय ते दृश्य दिले.
Four stills from a movie I believe is a masterpiece, no title.(Cannibal Holocaust. https://t.co/ygdlps833D pic.twitter.com/afTuVKNPNo
— Scarver Shawcross (@ScarverShawcro1) November 5, 2022
रिपोर्ट्सनुसार, जेव्हा चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं, तेव्हा दिग्दर्शकानं त्यांना कलाकारांच्या इच्छेविरुद्ध प्राण्यांना मारायला लावले, जेणेकरून सीन खरे वाटतील. कधी कासवाला मारलं तर कधी माकडाचा बळी दिला. शूटिंगची परिस्थिती अशी होती की कलाकारांना सेटवरच उलट्या व्हायच्या, तर तेथे उपस्थित असलेले काही लोक डिप्रेशनमध्ये गेले. काही कलाकारांच्या खासगी आयुष्यावरही याचा परिणाम झाला होता. बलात्काराचे सीन शूट केल्यानंतर अभिनेत्याने अभिनेत्रीसोबत असलेले मैत्रिचे सगळे संबंध तोडले कारण तो स्वत: चा तिरस्कार करू लागला होता.
10. CANNIBAL HOLOCAUST :
The director of Cannibal Holocaust had to prove in court that the actors were still alive and didn't get killed during the filming. pic.twitter.com/ysBKpXLB7V
— Aya (@Aya_Kleo) October 31, 2022
जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यांचे खूप कौतुक झाले होते, परंतु चित्रपटातील एवढी क्रूरता पाहून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आणि या चित्रपटावर जवळपास 50 देशांमध्ये बंदी घालण्यात आली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 10 व्या दिवशीच त्यावर बंदी आली. त्याची सर्व रील्स जप्त करण्यात आली.
An early entry in what has become known as the Found Footage subgenre, CANNIBAL HOLOCAUST also features enough real-life animal violence to make it one of the most controversial horror films ever made. My full review - https://t.co/Wn7KahaIGP pic.twitter.com/DoZBuJ611C
— Dave Becker (@dvdinfatuation) November 10, 2022
दिग्दर्शकावर कलाकारांच्या हत्येचा आरोप होता, तर दिग्दर्शकाला अटक करण्यात आली आणि खटला चालवण्यात आला होता. कारण काही कलाकारही चित्रपटाच्या शूटिंगनंतर बेपत्ता होते. यानंतर दिग्दर्शकानं पुरावा म्हणून कलाकारांना न्यायालयात सादर केले. असे म्हटले जाते की हा चित्रपट फक्त 1 लाख डॉलर्समध्ये तयार झाला होता आणि चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 200 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली होते. (movie to look real producer and director crossed line from a girl rape to animal brutality know details)