नेहा कक्कर प्रेग्नेंट? बिग बॉसच्या 'संडे का वार'मध्ये होणार खुलासा

नेहा कक्करच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन?

Updated: Sep 9, 2021, 08:20 AM IST
नेहा कक्कर प्रेग्नेंट? बिग बॉसच्या 'संडे का वार'मध्ये होणार खुलासा title=

मुंबई : प्रसिद्ध गायक नेका कक्कर आणि भाऊ टोनी कक्कर लवकरचं कॉन्ट्रोव्हर्शियल शो 'बिग बॉस' ओटीटीमध्ये उपस्थित राहणार आहे. दिग्दर्शक करण जोहरसोबत 'संडे का वार'मध्ये टोनी आणि नेहा स्टेज शेअर करणार आहेत. शिवाय ती बिग बॉसच्या घरात देखील जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे टोनी कक्करच्या नव्या म्यूझीक व्हिडिओचं प्रमोशन करण्यासाठी कक्कर भावंड बिग बॉसच्या शोमध्ये हजेरी लावणार आहेत. 

त्यामुळे येणारा रविवार प्रेक्षकांसाठी संगीतमय असणार आहे. शिवाय यावेळी नेहा तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखली मोठी घोषणा करणार आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, नेहा यावेळी ओव्हर टॉप अनाउंसमेन्ट करणार आहे. ही अनाउंसमेन्ट तिच्या प्रेग्नेसीशी निगडीत असणार आहे. नेहा प्रेग्नेंसीसोबतचं म्यूझीक व्हिडिओचं प्रमोशन करताना दिसणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A

गेल्या वर्षी 2020 मध्ये नेहा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा देखील तिने गाण्यासाठी भूमिका केली होती, ज्यामध्ये बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली. त्या गाण्याचं नाव होतं, 'ख्याल रखयाकर'... नेहा पुन्हा असचं काही करेल असा अंदाज चाहत्यांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नेहा कक्करच्या घोषणेकडे तिच्या चाहत्याचं लक्ष आहे.