प्रदर्शनाच्या एक वर्षाआधीच पुष्पा-2च्या स्ट्रीमिंग राइट्सची विक्री, या OTT Platform होणार रिलीज

Pushpa 2 OTT Platform: पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. आता पुष्पा-2 सिनेमाचीही घोषणा करण्यात आली आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स विकण्यात आले आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 26, 2023, 11:54 AM IST
 प्रदर्शनाच्या एक वर्षाआधीच पुष्पा-2च्या स्ट्रीमिंग राइट्सची विक्री, या OTT Platform होणार रिलीज title=
Netflix acquires digital rights of pushpa 2 the rule

Pushpa 2 OTT Platform: साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनची क्रेझ बॉलिवूडमध्येही कायम आहे. त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. अल्लू अर्जूनचा पुष्पा द राइज हा चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशाः डोक्यावर घेतलं होतं. महाराष्ट्रातही हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. काही दिवसांतच पुष्पा 2- द रुल चित्रपटाची घोषणादेखील झाली आहे. पुष्पाच्या सिक्वेलमधील लुकदेखील समोर आला आहे. 15 ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. तर, ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील हा चित्रपट कधी येणार याला खुलासा करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार रिलीज होण्याच्या आधीच पुष्पा 2- द रुलच्या स्ट्रीमिंग राइट्सची विक्री करण्यात आली आहे. 

पुष्पा2 द रुल हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तब्बल १ वर्ष आहे मात्र, त्याआधीच चित्रपटचे हक्क विकण्यात आले आहेत. ट्रेड एनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी ट्विटर (एक्स) अकाउंटवरुन ही घोषणा केली आहे. त्यांच्या ट्विटनुसार, अल्लू अर्जूनच्या पुष्पा 2चे थ्रिटेकिल स्ट्रीमिंग राइट्स नेटफ्लिक्सने रेकॉर्डब्रेक किमतीवर विकत घेतले आहेत. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीये. 

दरम्यान, पुष्पा- द राइज चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई केली होती. चित्रपटातील डायलॉग्स, कलाकारांचा अभिनय, पटकथा आणि चित्रपटातील गाणी यामुळं चित्रपट चांगलाच गाजला होता. पुष्पराज म्हणजेच अल्लू अर्जूनची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. यातील गाणीही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. त्यामुळं प्रेक्षकांना पुष्पा-2 कडून अधिक अपेक्षा आहेत. पुष्पा-2 अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जून, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल हे प्रमुख भूमिकेत असणार आहे. 

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नेटफ्लिक्सवर येणार आहे. रिलीज होण्याच्याआधीच हा चित्रपटाचे हक्क विकत घेण्यात आले आहेत. त्यामुळं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नेटफ्लिक्सवर या आधीपासूनच साउथ इंडियन चित्रपट उपलब्ध आहेत. नेटफ्लिक्सने पुष्पा-2 सोबकच सालारचे ओटीटी राइट्सही विकत घेतले आहेत. तर, याआधी प्रदर्शित झालेला पुष्पा द राइज अॅमेझॉनवर उपलब्ध झाला होता. नेटफ्लिक्सने स्ट्रिमिंग राइट्ससाठी किती रुपयांची बोली लावली होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.