मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री shabana azmi शबाना आझमी यांचा शनिवारी दुपारच्या सुमारास मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला. ज्यानंतर आझमी यांना जखमी अवस्थेत तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
'एएनआय' या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर येथे हा अपघात झाला. ज्यामध्ये शबाना आझमी आणि त्यांच्या कार चालकाला या गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी आझमी यांचे पती, गीकार जावेद अख्तरही कारमध्ये होते. पण, त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
आझमी यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. ज्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली, त्या लवकरात लवकर ठीक व्हाव्यात अशी प्रार्थनाही केली. पण, एक असा गटही यावेळी सोशल मीडियावर सक्रिय दिसला ज्यांनी त्यांच्याविषयी काही आक्षेपार्ह लिहित करावं तसं भरावं... या आशयाचे ट्विट केले.
Dear #ShabanaAzmi ji
we may have different opinions on most of the issues I don't like your Views at all, But I pray for your speedy recovery. pic.twitter.com/ED0hP7dWCQ
— Narendra Modi fan (@narendramodi177) January 18, 2020
The amount of hate @AzmiShabana and @Javedakhtarjadu are getting is horrifying beyond words. I hope she gets better and I hope people wanting her dead find something worthy to do with their lives.
— bure din wapas dedo (@putaetu) January 18, 2020
Here Biggest Troll Army Cheering #ShabanaAzmi 's Accident ,Is This Civilised Society ? pic.twitter.com/oNHqwpVMpp
— Sanwar Ali (@advsanwar) January 18, 2020
Pray for #ShabanaAzmi
Maybe you doesn't believe in her ideology but she is a human and it's humanity to pray for her when she is in danger.#JaiShriRam
— MDH Wale Kaka (JNU Fresher) (@trolling_daddy) January 18, 2020
Look At the Comments...
How Cheap..
Kitna Gir gye log is Hindu Muslim K chakker me..#ShabanaAzmi https://t.co/yWN0ejd5Ki
— SuBoor PiLot (@suboorpilot) January 18, 2020
पाहा उणे ४० अंश तापमानात भारतीय सैन्यातील जवान कसं करतात देशाचं रक्षण
अतिशय गंभीर प्रसंगी असं बेताल वागणाऱ्या या गटाला नेटकऱ्यांनीच धारेवर धरत त्यांना खडे बोल सुवानले. हा राग, संताप आणि घृणेची भावना पराभूत व्हावी आणि शबाना आझमी लवकरात लवकर या आघातातून सावराव्यात असं म्हणत त्यांना एक प्रकारे धीर देण्यात आला. हाच आला समाज आहे का? हीच आपली शिकवण आहे का? असे संतप्त सवालही उपस्थित करण्यात आले. आझमी यांची विचारसणी पटत नसेलही. पण, एक व्यक्ती म्हणून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठीच सर्वांनी प्रार्थना करावी अशी आर्दवही काहींनी केली. एकंदरच सोशल मीडियाच्या माध्यमातून माणुसकीच्या नावावर जिथे संताप आणि घृणेच्या भावनेचं दर्शन झालं तिथेच या समाजातील माणुसकी जपणाऱ्यांनी पुढाकार घेत चुकीच्या गोष्टींना पुरतं ठेचण्याचा प्रयत्न केला असं म्हणणं गैर ठरणार नाही.