मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय pop singer madonna पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या महिन्यात तिने आपल्या कारकिर्दीच्या 40 वर्षांच्या स्मरणार्थ रिमिक्स अल्बम रिलीज केला. फाइनली इनफ लवः 50 नंबर वन्स (Finally Enough Love: 50 Number Ones) पण यानंतर तिने तीन दिवसांपूर्वी तिच्या यूट्यूब चॅनलवर एक मुलाखत-व्हिडिओ शेअर केला होता. जो हेडलाईन्स बनत आहे.
Finally Enough Talk: 50 Questions with Title च्या या व्हिडिओमध्ये madonna तिच्या आयुष्याशी आणि करिअरशी संबंधित उत्तरे देते. यातील अनेक उत्तरे अतिशय झटपट आहेत आणि चाहत्यांना खूप आवडली आहेत. madonna ची इमेज खूप मस्त आहे आणि तिच्या काळात तिला संपूर्ण पश्चिमी जगामध्ये (Sex Symbol) मानलं जातं.
64 वर्षीय मॅडोना आजही चर्चेत आहे. दोनदा लग्न केलेली मॅडोना तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे आणि सध्या तिच्यापेक्षा 41 वर्षांनी लहान असलेल्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मॅडोना सहा मुलांची आई आहे. तिचा मोठा मुलगा तिच्या नवीन बॉयफ्रेंडपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे आणि दुसरा मुलगा तिच्या प्रियकरापेक्षा फक्त एक वर्षांनी लहान आहे.
मॅडोना सध्या 23 वर्षीय अँड्र्यू डार्नेलला डेट करत आहे. अँड्र्यू एक मॉडेल आहे. दरम्यान, तिच्या अल्बम आणि व्हिडीओमुळे चर्चेत असलेल्या मॅडोनाला एका यूट्यूब मुलाखतीत विचारण्यात आलं होतं की तिला आज तिच्या आयुष्यात कशाचा पश्चात्ताप होत आहे. तेव्हा तिने सांगितलं की, लग्नाचा. दोन्ही लग्नाचा!
मस्त आयुष्य जगा
उल्लेखनीय आहे की मॅडोनाचं पहिलं लग्न अमेरिकन अभिनेता-दिग्दर्शक सीन पॅनशी झालं होतं, जे 1985 ते 1989 पर्यंत टिकलं. पॅनशी घटस्फोट घेतल्यानंतर तिने 2000 मध्ये अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक गाय रिचीशी लग्न केलं. हे लग्न आठ वर्षे टिकलं आणि २००८ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. अमेरिकन समाजात मॅडोनाची प्रतिमा एका बंडखोर महिलेची आहे. जिने कधीही कोणाचीही पर्वा केली नाही आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगलं.
मॅडोनाची सेक्स सिम्बॉल इमेज आणि लाइव्ह कॉन्सर्टमधील तिच्या बोल्ड परफॉर्मन्समुळे परंपरावादी विचार करणारे नेहमीच त्रासलेले असतात. आजही 64 वर्षांची मॅडोना तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर असे बोल्ड फोटो आणि असा मजकूर पोस्ट करते की, लोक आश्चर्यचकित होतात.