VIDEO : 'झिरो'ची मलालाकडून प्रशंसा, म्हणाली...

आनंद एल.राय दिग्दर्शित 'झिरो' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

Updated: Dec 23, 2018, 12:21 PM IST
VIDEO : 'झिरो'ची मलालाकडून प्रशंसा, म्हणाली... title=

मुंबई : आनंद एल.राय दिग्दर्शित 'झिरो' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. शाहरुख खानची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला असतानाच एका व्यक्तीने मात्र किंग खानच्या या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. ती व्यक्ती म्हणजे नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई. 

एका व्हिडिओच्या माध्यमातून मलालाने शाहरुखच्या 'झिरो' या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. हा चित्रपट अतिशय मनोरंजक असून, मला आणि माझ्या कुटुंबीयांनाही तो फारच आवडला आहे, असं मलाला या व्हिडिओमध्ये म्हणातान दिसत आहे. 
शाहरुखच्या चित्रपटासाठी मलालाने दिलेली ही प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची असून, फक्त भारतातच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय पातळीवरही किंग खानची जादू कायम आहे हेच पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.

शाहरुखप्रती मलालाने एक चाहती म्हणून आपलं प्रेमही व्यक्त केलं आहे. तिने यापूर्वीही त्याची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याशिवाय कधी शाहरुख ऑक्सफर्ड किंवा युकेच्या कोणत्या भागात आलाच तर, त्याची भेट घेण्याची इच्छाही तिने व्यक्त केली. 

'झिरो' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चाहत्यांची या चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली होती. पण, मुळात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र ही उत्सुकता काहीशी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. कथानकाच्या बाबतील या चित्रपटाने निराशा केल्याची प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर 'झिरो' अपेक्षित कमाईचे आकडे गाठतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.