शिल्पा-मलायका नव्हेतर 'या' अभिनेत्रीला देण्यात आलाय जगातील सर्वात परफेक्ट फिगरचा किताब, जाणून बसेल धक्का

योगा, जिम, ऐरोबिक्स, झुम्बा सारखे व्यायाम करत योग्य आहार घेऊन अनेक महिला स्वतःला फिट ठेवतात. यामध्ये सेलेब्रिटी सगळ्यात पुढे आहेत, असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही.

Updated: Jan 22, 2023, 01:08 PM IST
शिल्पा-मलायका नव्हेतर 'या' अभिनेत्रीला देण्यात आलाय जगातील सर्वात परफेक्ट फिगरचा किताब, जाणून बसेल धक्का title=

मुंबई : फिट आणि परफेक्ट फिगर असावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. आकर्षक शरीर आणि सुंदर बांधा, परफेक्ट फिगर असावी असं जगातील प्रत्येक स्त्रीला वाटतं.  त्यासाठी अनेक महिला आपल्या फिटनेस कडे खास लक्ष देतात.

योगा, जिम, ऐरोबिक्स, झुम्बा सारखे व्यायाम करत योग्य आहार घेऊन अनेक महिला स्वतःला फिट ठेवतात. यामध्ये सेलेब्रिटी सगळ्यात पुढे आहेत, असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. विशेष म्हणजे या अभिनेत्रींचा फिटनेस बघून त्याच्या वयाचा अंदाज लावताच येत नाही. मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी, लारा दत्ता, ऐश्वर्या राय बच्चन, करिष्मा कपूर अशा अभनेत्रींचा फिटनेस तरुणींना लाजवेल असा आहे.

मात्र कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल, पण जगातील सर्वात सुंदर स्त्री जरी ऐश्वर्या राय बच्चन असली तरीही ती जगातील सर्वात फिट अभिनेत्री नाहीये. मलायका किंवा शिल्पा देखील सर्वात फिट अभिनेत्री नाहीयेत. तर यामध्ये सर्व बॉलीवूड अभिनेत्रींना मागे टाकत, हॉलीवूडच्या एका अभिनेत्रीने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने चाळीशी कधीच पार केली आहे.

परफेक्ट महिला...
परेफेक्ट महिलेसाठी संशोधकांनी काही मापदंड ठेवले आहेत त्यानुसार एका परफेक्ट महिलेची उंची १.६८ मीटर तिचे बस्ट, वेट आणि हिप्स ची साइज ९९-६३-९१ असते. तिच्या शरिरावर कोणत्याही प्रकारची सर्जरी न झालेली असावी. 

मात्र असं असलं तरीही, तिच्या परफेक्ट फिगरकडे बघून तिच्या वयचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. हॉलीवूड अभिनेत्री 'केली ब्रुक' कायमच आपल्या फिटनेस आणि सौंदर्यासाठी चर्चेत असते. १९९७मध्ये केली सर्वात पहिले एका म्युझिक अल्बममध्ये झळकली होती. 'केली ब्रुक' एक टेलिव्हिजन शो प्रेझेन्टर देखील आहे.

केली अत्यंत सुंदर असून तिला परफेक्ट वूमनचा किताब देण्यात आला आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे, केलीने अद्याप कोणत्याही प्रकारची प्लास्टिक सर्जरी केलेली नाहीये. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्ससच्या एका रिसर्चनुसार 'केली ब्रुक' जगातील सर्वात परफेक्ट बॉडी असणारी महिला म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

चेहऱ्याचा आकार, शरीर आणि केसांची लांबी, वजन या सर्व पॅरामीटरवर आधारित हा रिसर्च करण्यात आला होता. आणि या रिसर्चनुसार, केली ब्रुकची फिगर सर्वात सुंदर आणि आकर्षक आहे. अनेक अभिनेत्री परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करतात.

मात्र केलीच्या जवळच्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, केली ब्रुककडे सगळं काही आहे. देवाने तिला बनवताना कदाचित खूप वेळ घेतला असेल. कारण तिला कोणत्याही प्लास्टिक सर्जरीची आवश्यकताच नाही. ती खूप सुंदर आहे. ब्रिटनच्या फॅशन मॅगझीनने FHM ने २००५ केली ब्रुकला 'सेक्सिएस्ट वूमन ऑफ द इयर' म्हणून नावाजलं होत. अनेकदा ती कॉंट्रोव्हर्सीमध्ये देखील अडकली होती. अलीकडेच २०२०मध्ये केली ब्रुकचं वाढलेलं वजन चर्चेचा विषय बनला होता.