नात्यात तडजोड फक्त महिलांना करावी लागते घटस्फोटानंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

अभिनेत्रीने अनेक वर्षांनंतर तिच्या खासगी जीवनाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Updated: Jun 11, 2021, 01:42 PM IST
नात्यात तडजोड फक्त महिलांना करावी लागते घटस्फोटानंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबाने अनेक वर्षांनंतर तिच्या खासगी जीवनाबद्दल मोठा खुलासा केला आहे. मिनिषाने एका मुलाखतीत फक्त घटस्फोट नाही तर आलेल्या प्रसंगांचे अनुभव देखील सांगितले आहेत. नात्यात कडवटपणा आल्यानंतर  वोगळं होणं योग्य असतं. शिवाय नात्यात तडजोड फक्त महिलांना करावी लागते असं देखील मिनिषा म्हणाली. मिनिषाने 2015साली  रायन थामसोबत लग्न केलं. पण त्यांचं नातं फक्त 5 वर्ष टिकलं. 

घटस्फोटानंतर पहिल्यांना दिलेल्या एका मुलाखतीत मिनिषा म्हणाली,'आता महिला देखील त्यांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करतात. सर्वांना आनंदी राहण्याचा अधिकार आहे. प्रत्येक जण स्वतःचे विचार स्वतंत्र रूपाने मांडण्यासाठी सक्षम आहे. अत्यंत बदल झाले आहेत. पूर्वी नातं टिकवून ठेवण्याची जबाबदारी फक्त महिलांवर होती. '

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Minissha (@minissha_lamba)

पुढे मिनिषा म्हणाली, ' नात्यात फक्त महिला त्याग का करतील? पण आता सर्व गोष्टी महिलांना उमगलं आहे. नात्यात आनंद नसेल तर त्या नात्यातून बाहेर येणं उत्तम आहे.' समाजात घटस्फोट योग्य नाही असा समज आहे. पण आता वेळ पूर्ण बदलली आहे. असं देखील मिनिषा म्हणाली. 

मिनिषा म्हणाली, 'विभक्त होणं फार कठिण आहे. पण तुमच्या नात्यात कडवटपणा येत असेल तर ते नातं तुटलेलं चांगलं असतं. लग्न जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. पण संपूर्ण आयुष्य लग्न नाही. पहिल्या नात्यात तुम्हाला सुःख मिळत नसेल तर दुसऱ्यांदा प्रेम करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.'

मिनिषाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, मिनिषाने 2005 साली 'यहां' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने 'कॉपरेट', 'रॉकी', 'एंथनी कौन है', 'अनामिका', 'दस कहानिया' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता मिनिषा 'कुतुब मिनार' या कॉमेडी चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.