Oops Moment : शॉर्ट स्कर्ट घालणं अभिनेत्री उर्वशी रौतेलाला पडलं महागात

अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या फॅशनेबल ड्रेसमुळे नेहमीच चर्चेत असते.

Updated: May 3, 2022, 08:31 PM IST
Oops Moment : शॉर्ट स्कर्ट घालणं अभिनेत्री उर्वशी रौतेलाला पडलं महागात title=

मुंबई : बॉलीवूडमध्ये आपल्या सौंदर्याची झलक दाखवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या फॅशनेबल ड्रेसमुळे नेहमीच चर्चेत असते. तिची स्टाइल नेहमीच ऑन पॉइंट पाहायला मिळते. क्वचितच असा दिवस असेल की मीडियाने उर्वशीला साध्या लूकमध्ये पाहिलं असेल. कारण जेव्हा ही अभिनेत्री घराबाहेर पडते तेव्हा तिचे कपडे फॅशन शोसाठी तयार झाल्या सारखे असतात. नुकतंच जेव्हा मीडियाच्या कॅमेऱ्यांनी उर्वशीला कॅमेऱ्यात स्पॉट केलं. तेव्हा अभिनेत्रीचा ऊप्स मोमेंट कॅमेऱ्यात कैद झाला.

एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या उर्वशीचा आउटफिट दमदार दिसत होता. पण एअरपोर्टवर एंट्री घेताच सोसाट्याच्या वाऱ्याने उर्वशीचा स्कर्ट उडाला आणि अभिनेत्रीचा ऊप्स मोमेंट क‌मेऱ्यात कैद झाला. 

तर या व्हिडिओमध्ये उर्वशी फोटोग्राफर्सशी बोलताना दिसत आहे. उर्वशी रौतेला प्रत्येक वेळी तिच्या सुंदर ड्रेसद्वारे तिचं सौंदर्य फ्लाँन्ट करताना दिसते. उर्वशीच्या दमदार अभिनयाची जादू चाहत्यांना खूप आवडते. उर्वशी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिचे 49 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि ही संख्या लवकरच 50 मिलियन होणार आहे. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ती शेवटची व्हर्जिन भानुप्रियामध्ये तिच्या अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी दिसली होती.