मध्यप्रदेशमध्ये ही पद्मावती सिनेमाच्या अडचणी वाढल्या

संजय लीला भंसाली यांच्या 'पद्मावती' सिनेमा चांगलाच वादात सापडला आहे. नवीन नवीन वाद सिनेमावरुन समोर येत आहेत. यातच आणखी एक बॅडन्यूज पद्मावतीसाठी आली आहे.

Updated: Nov 20, 2017, 05:56 PM IST
मध्यप्रदेशमध्ये ही पद्मावती सिनेमाच्या अडचणी वाढल्या title=

नवी दिल्ली : संजय लीला भंसाली यांच्या 'पद्मावती' सिनेमा चांगलाच वादात सापडला आहे. नवीन नवीन वाद सिनेमावरुन समोर येत आहेत. यातच आणखी एक बॅडन्यूज पद्मावतीसाठी आली आहे.

मध्य प्रदेशमध्ये पद्मावतीवर बॅन

मध्य प्रदेशमध्ये पद्मावतीवर बॅन लावण्यात आला आहे. हा सिनेमा आता पंजाबसोबतच मध्यप्रदेशमध्ये देखील सिनेमाला विरोध होत आहे. मुख्‍यमंत्री शिवराज सिंह यांनी जाहीर केलं आहे की मध्‍यप्रदेशमध्ये पद्मावती सिनेमा नाही दाखवला जाणार. शिवराज सिंह चौहान यांनी पुढे म्हटलं की, 'राष्ट्रमाता' पद्मावती बद्दल चुकीचं दाखवण्यात आलं आहे. तर हा सिनेमा राज्यात नाही दाखवला जाणार.'

मुख्यमंत्र्यांचा विरोध

शिवराज सिंह यांनी म्हटलं की, ऐतिहासिक तथ्य बदलून जर राष्ट्रमाता पद्मावती यांचा अपमान होत असेल असे दृश्य ज्या सिनेमात असेल तर असा सिनेमा उत्तर प्रदेशच्या धरतीवर प्रदर्शित नाही होणार.

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनीही लिहिलं पत्र

याआधी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून याबाबत विरोध दर्शवला होता. वसुंधरा राजे यांनी सूचना आणि प्रसारण मंत्री स्मृती ईरानी यांनी पत्र लिहून आग्रह केला होता की, पद्मावती सिनेमा तोपर्यंत रिलीज नाही झाला पाहिजे जोपर्यंत त्यामध्ये काही बदल नाही केले जात. ज्यामुळे कोणत्याही समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत.