Pankaj Tripati : बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांच्या कामासोबतच त्यांचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत असतं. त्यांची साधी रहाणी ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. पंकज त्रिपाठी यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगी देखील चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांची लेक चर्चेत आली होती आणि आता त्यांची पत्नी. पंकज त्रिपाठी यांची पत्नी मृदुला चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आणि पंकज त्रिपाठी यांच्या रिलेशनशिपविषयी आणि त्याशिवाय त्यांच्यात होणारी छोटी-मोठी भांडणं आणि प्लास्टिकचे बॉक्स खरेदी करण्यावर होणारे वाद. इतकंच नाही तर मृदुला यांनी आणखी एक गोष्ट सांगितलं की पंकज त्रिपाठी जेव्हा सेटवर असतात तेव्हा त्या थेट त्यांना फोन करून कोणती वस्तू कुठे ठेवली आहे हे विचारतात.
कॉन्वर्सेशन्स विथ अतुल यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली आहे. मृदुलानं त्याच्या कुटुंबाविषयी सांगितलं की 'जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आलो तेव्हा पंकजकडे जास्त काम नव्हतं आणि त्यांच्यात बोलणं हे झालं होतं की दोघं मिळून घराची जबाबदारी घेतील.'
मृदुलानं सांगितलं की तो कायम बोलतो की तो कोणत्याही शॉटसाठी तयार होत असेल किंवा मग जेव्हा त्याच्याकडे थोडा वेळ असेल तेव्हा तो मला कॉल करतो. त्यावेळी त्याला माझे अशा प्रकारचे प्रश्न असतात की ती डाळ मागवली होती, ती कुठे ठेवलीस? आणि तो सांगतो की कुठे ठेवली आहे. मृदुला पुढे म्हणाल्या की स्टारडम किंवा लोकप्रियता मिळाल्यानंतरही पंकज यांच्यात कोणताही बदल झालेला नाही आणि ते आजही खादीचे कपडे परिधान करतात.
हेही वाचा : अमिताभ, जया यांच्या लग्नातील मेन्यू काय होता? KBC 16 मध्ये बिग बींनीच सांगितलं...
पुढे मृदुला म्हणाल्या की 'तो कधी-कधी मस्करीत बोलतो की तो आता एक स्टार आहे त्यामुळे त्याच्याशी सगळ्यांना आदरानं बोलायला हवं. मृदुला यांनी पुढे सांगितलं की त्यांचे मित्र जेव्हा त्यांच्या घरी येतात, तेव्हा त्यांच्या घरी सुविधांची कमी पाहून हैराण होतात. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे आजही मायक्रोव्हेव अव्हन नाही, तुम्ही यावर विश्वास करु शकता का? त्यांचं म्हणणं आहे की कोणाचाही यावर विश्वास होत नाही. जर आम्हाला गरम जेवण करायचं असेल तर आम्ही चुल्हीवर गरम करतो. शहरातील आमच्या घरात खूप क्रॉसवेंटिलेशन आहे, त्यामुळे तिथे कधीच कोणती मोठी समस्या झाली नाही. पण बंगल्यात दमट वातावरण असतं. एकदिवस त्यांना खूप घाम येत होता तेव्हा जाऊन जबरदस्तीनं एसी घेतला.'