Paresh Rawal यांना आलाय 'बाबु भैय्या'चा कंटाळा?

Paresh Rawal Birthday : परेश रावल यांचा आज वाढदिवस आहे. त्यांची बाबु भैय्या ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते पण तुम्हाला माहितीये का? हिच भूमिका परेश रावल यांना आता आवडत नाही. त्यांना या भूमिकेचा कंटाळ आला आहे. परेश रावल यांच्या वाढदिवसानिमित्तानं चला जाणून घेऊया कारण...

दिक्षा पाटील | Updated: May 30, 2023, 04:48 PM IST
Paresh Rawal यांना आलाय 'बाबु भैय्या'चा कंटाळा? title=
(Photo Credit : Still From Movie)

Paresh Rawal Birthday : आजही आपल्या सगळ्यांना एकमेकांना काही मिम्स पाठवायचे असतील तर सगळ्यात आधी आपण 'हेरा फेरी' या चित्रपटातील डायलॉग्स शोधतो. 'हेरा फेरी' या चित्रपटातील डायलॉग्स हे डायलॉग्स नक्कीच सगळ्यांचे आवडते आहेत. याच चित्रपटातील बाबू भैय्या या भूमिकेच नाव घेतलं तरी सुद्धा प्रेक्षकांना त्याचे काही डायलॉग्स आठवतात आणि ते हसू लागतात. ही भूमिका परेश रावल यांनी साकारली होती. या भूमिकेच्या माध्यमातून जसं त्यांनी सगळ्यांची मने जिंकली. ज्या भूमिकेतून लोकप्रियता मिळाली त्याच भूमिकेचा परेश रावल यांना आहे कंटाळ. 

बाबू भैय्या या भूमिकेनं जरी सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली असली तरी देखील परेश रावल यांनी ही भूमिका आवडत नाही. याविषयी परेश रावल यांनी एका भूमिकेत सांगितले होते की "मी साकारलेल्या सगळ्या भूमिका मला आवडतात. पण एक भूमिका आहे ज्याविषयी ऐकायला मला कंटाळ येतो आणि ती भूमिका म्हणजे बाबू भैय्या. मला या भूमिकेपासून सुटका पाहिजे." हेरा फेरी 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आपल्याला पुन्हा एकदा बाबु भैय्या दिसणार असले तरी देखील स्वत: परेश रावल यांना या भूमिकेचा कंटाळ आला आहे हे ऐकूण त्यांच्या चाहत्यांना मात्र, फार वाईट वाटले आहे. 

परेश रावल यांना अभिनय नाही तर या क्षेत्रात करायचे होते काम

परेश राव यांचा जन्म हा 30 मे 1950 रोजी मुंबईत झाला. त्यांना कधीच अभिनेता व्हायचे नव्हते. लहाणपणापासून त्यांना सिव्हिल इंजीनीयर व्हायची इच्छा होती. पण शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना शोधूनही नोकरी मिळत नव्हती त्यामुळे त्यांनी अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर काय आपल्या सगळ्यांना आपले बाबु भैय्या मिळाले. 

हेही वाचा : Vaibhavi Upadhyaya च्या अपघाती मृत्यूनंतर होणाऱ्या पतीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट

परेश रावल यांच्या करिअर विषयी बोलायचे झाले तर भूमिका ही पॉजिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह याचाच अर्थ सपोर्टिंग असो किंवा मग खलनायकाची परेश रावल यांच्या प्रत्येक भूमिका या नेहमीच लक्षात राहतात. परेश रावल यांनी अभिनय क्षेत्रात जेव्हा पदार्पण केलं तेव्हा त्यांचा पहिला चित्रपट हा गुजराती होता आणि त्या चित्रपटाचं नाव 'नसीब नी बलिहारी' असं होतं. त्यानंतर त्यांनी 1985 साली प्रदर्शित झालेल्या 'अर्जुन' या बॉलिवूड चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तर परेश रावल लवकरच 'ओह माय गॉड 2' या चित्रपटात दिसणार आहेत.