पवित्र पुनियाला जेव्हा ऑफर झाला Nude Scene, काय होती प्रतिक्रिया

कुटुंबाबाबत केलं हे वक्तव्य 

Updated: Apr 23, 2021, 03:35 PM IST
पवित्र पुनियाला जेव्हा ऑफर झाला Nude Scene, काय होती प्रतिक्रिया  title=

मुंबई : बिग बॉसची 14 ची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया सध्या चर्चेत आहे. पवित्राचा प्रवास हा स्प्लिटविला सीझन 3 मधून सुरू झाला आहे. ज्यानंतर तिला न्यूड सीन ऑफर झाला होता. याबाबतच खुलासा तिने आता केला आहे. (Pavitra Punia says she got offers to do nude scenes after Splitsvilla) एवढंच नव्हे तर जेव्हा हे काम तिला मिळालं तेव्हा तिची प्रतिक्रिया नेमकी काय होती? याचा खुलासा तिने यामध्ये केला आहे. 

न्यूड सीनची आली होती ऑफर 

एका मुलाखतीत पवित्राने खुलासा केला आहे की,'रिऍलिटी शोनंतर मला न्यूड सीनची ऑफर मिळाली होती. अनेक वेबसाइट आणि सिनेमात बोल्ड कंटेटकरता काम करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर 'सॉफ्ट पॉर्न' म्हणतात. पण मी अशा कुटुंबातून आले आहे. ज्यांच्यासमोर किंसिंग किंवा लव मेकिंग सीन बघू शकत नाही. त्यामुळे असे सीन करणं मला वेगळं वाटत होतं. त्यामुळे हे ऐकल्यानंतर मी तिथून निघून गेली.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pavitra Punia (@pavitrapunia_)

पवित्राच्या कुटुंबाची संकुचित वृत्ती

पवित्राने एका मुलाखतीत म्हटलंय की, तिच्या कुटुंबाची संकुचित वृत्ती आहे. यामुळे तिचं अभिनय क्षेत्रातील पदार्पण स्विकारायला थोडा वेळ लागला. मला कळलं की, माझे कुटुंबिय मला टीव्हीवर बघण्यास अजून तयार नाही. मग त्यांनी मला बोल्ड सिन करताना पाहिलं असतं तर मला खूप दुःख झालं असतं. त्यामुळे बोल्ड कंटेंटमध्ये करिअर करण्यास मी तयार नाही.